खुशखबर..बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबून विकासाची गंगा वाहणार, १५ हजार कोटींची गुंतवणूक येणार..!!
खुशखबर..बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी थांबून विकासाची गंगा वाहणार, १५ हजार कोटींची गुंतवणूक येणार..!!
बीड (प्रतिनिधी):- दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. तसेच, दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार होते. यात विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात पवनऊर्जा क्षेत्रामध्ये कोट्यवधींची गुंतवणुकीची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात १५,००० मेवा पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली असून हा गुंतवणूक करार झाल्यास हजारोंची रोजगार निर्मिती होणार आहे. फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी
जिल्हावासियांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
दरम्यान बीड जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात विशेष अशी प्रगती झालेली नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बीड जिल्हावासियाना मोठा अपेक्षा आहेत. जिल्हात भयमुक्त वातापरण निर्माण करण्यासाठी आधीपासून मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न सुरु असून जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी उद्योजक देखील सकारात्मक असल्याचे कळते
मुख्यमंत्र्यांनी अनेक उद्योजकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात १५,००० मेगावॉट पाईपलाईन आणि पवनऊर्जा प्रकल्पाबाचत यावेळी चर्चा झाली. तसेच, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातही गुंतवणूक केली जाणार असल्याबाबत चर्चा झाली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध कंपन्यांच्या मालकांशी चर्चा करून गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले आहे. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.