2024 खरीप हंगामाच्या पिक विम्याची अग्रीम रक्कम उन्हाळा आला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही.. यासाठी वारंवार पाठपुरावा हा केला गेला असून देखील पिक विमा कंपनीकडून दिला जात नाही..

अग्रीम का दिला जात नाही याची विचारणा केली असता राज्य सरकारकडून पिक विमा कंपनीस सबसिडी हप्ता मिळाला नसल्याचे पिक विमा कंपनी जिल्हा प्रतिनिधी कडून कळते आहे..
पात्र शेतकऱ्यांचा सर्व काही डेटा तयार असून राज्य सरकारचा सबसिडी हप्ता मिळताच शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे..

कळलेल्या माहितीनुसार, खरीप २०२४ मध्ये १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील नऊ लाख ८१ हजार शेतकरी अग्रिमसाठी पात्र आहेत. यामध्ये व्यापक आपत्ती या प्रकारात ६ लाख ७८ हजार, तर वैयक्तिक या प्रकारात ३ लाख शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना अग्रिम मिळणार असल्याची माहिती कळली दिली.
2023 खरीप हंगामाचा पिक विमा आता 2025 च्या उन्हाळ्यामध्ये वाटप होतो आहे.. मग 2024 चा पिक विमा या पिक विमा कंपनीला काय थेट 2026 मध्ये द्यायचा आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक असताना एकही लोकप्रतिनिधी खरीप पिक विमा बाबत बोलायला देखील तयार नाही हे दुर्दैव बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी आलेले आहेत..
धनंजय गुंदेकर, बीड
096890 43949