Latest Breaking News Form Maharashtra

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : कृषिमंत्री कोकाटेंनी खरीप पीकविमा 2024 रक्कम जमा व्हायची तारीख विधानसभेत दिली…

“शेतकऱ्यांना खरीपातील विमा प्रीमियम आणखी देखील भेटले नाही! मेट्रो सिटीत पुलांची बांधकामे करायला तुमच्याकडे ५०-५० हजार कोटी आहेत, पण माझ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विमा द्यायला ५८ कोटी नाहीत! आम्ही रोज आंदोलने करतोय. तात्काळ विमा द्या! उडवाउडवीची उत्तरे काय देता?” 

 

पिकविम्याच्या संदर्भातील प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडत सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका ही आमदार राहुल पाटील यांनी केली. 

 

यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात शब्द दिला की शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे 31 मार्चच्या अगोदर जमा होतील, याची काळजी घेऊ!

 

कृषिमंत्री साहेब तुम्ही म्हणताय 2024 चा खरीप पिक विमा 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल तर आम्ही यावर विश्वास नक्कीच ठेवू.. यापूर्वी शेतकऱ्यांना असेच तारीख पे तारीख मिळालेली असल्याने शेतकरी देखील आता कृषी मंत्र्यांवर विश्वास ठेवून नव्हते.. मात्र गडी बदलला की राज बदलते त्या पद्धतीने आपण आज विधानसभेत घोषणा केल्याबद्दल आपले आभार मात्र दिलेल्या वेळेत तरी कृपया आपण 2024 खरीप पिक विमा द्यावा हे आपणास विनंती..

पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप 2024 ची नुकसान भरपाई देण्यासाठी 2197.15 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आपण आज विधिमंडळात सांगितले आहे… राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीवर आहे असा आपण आज म्हटले आहे.. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप 31 मार्चपूर्वीच करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज बुधवारी (ता.19) विधीमंडळात दिली आहे…

आपण म्हटलात की अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने वित्त विभागाकडून निधी घ्यायला वेळ लागेल 

… एकदा निधी मिळाला की तात्काळ पिक विमा कंपनीला वर्ग करण्यात येईल.. यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना पिक विमा देणे शक्य नसून 31 मार्च पूर्वी आम्ही पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करू असं आश्वासन आपण आपल्याच पक्षातील व विरोधी पक्षातील आमदारांनी सवाल अनुपस्थित केल्यानंतर दिले आहे… कृपया आपण शब्दाला जागावे… अन्यथा मागच्या मंत्र्यांप्रमाणे पुढचे पाठ मागचे सपाट असे काही होऊ देऊ नका…

आपण शब्द पाळल्यावर असाच चांगला फोटो ठेवून मी आपले आभार मानेल…

धनंजय गुंदेकर बीड 

096890 43949 

#manikraokokate #latestupdate #marathinews #agriculture #cropinsurance

Leave A Reply

Your email address will not be published.