Latest Breaking News Form Maharashtra

पोलिस अधिकारीच चुकले.. एसपी साहेबांकडून “चुकीला माफी नाहीच..!!” PSI निलंबित..!

पोलिस अधिकारीच चुकले.. एसपी साहेबांकडून “चुकीला माफी नाहीच..!!”पोलिस अधीक्षक साहेबांनी आपल्याच अधिकाऱ्याविरुद्ध मोठ्ठी कारवाई केल्याचे समोर येत असून थेट पीएसआयला निलंबित केलं गेल आहे..  

सायबर विभागात कार्यरत आलेल्या पोलीस उपनिरीक्षक रणजित कसले यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे…पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी निलंबनाचे आदेश काढले असल्याचे कळते आहे..

 

रणजित कासले सायबर विभागातील एका प्रकरणाच्या तपासासाठी बाहेर राज्यात गेले होते… यावेळी त्यांनी संबंधित प्रकरणात पैशांची तडजोड केली असल्याचा थेट व्हिडीओच बाहेर आला….

 

 हे प्रकरण बीड जिल्हापुरते मर्यादित न राहता थेट राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांकडे गेले होते…. अखेर यात तपासाअंती रणजित कासले दोषी आढळल्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे….

 दरम्यान पोलीस अधिक्षक यांनी चुकीचे काम करणाऱ्या आणखी एका अधिकाऱ्याला दणका दिल्यामुळे खाकीतच खळबळ उडाली आहे….या कारवाईच स्वागत सामान्य जनतेमधून होत असून अशीच धडाकेबाज कारवाई आपला अधिकारी चुकला तरी पोलिस अधीक्षक यांनी केलेली पाहून त्यांचं कौतुक होतं..

Leave A Reply

Your email address will not be published.