Latest Breaking News Form Maharashtra

ज्ञानराधा ठेवीदारांसाठी रक्कम मिळण्याच्या क्लेम नोंदणी अर्जाबाबत शासकीय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून महत्वाचे प्रसिध्दीपत्रक..

ज्ञानराधा ठेवीदारांसाठी रक्कम मिळण्याच्या क्लेम नोंदणी अर्जाबाबत शासकीय जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून महत्वाचे प्रसिध्दीपत्रक..

 

 

ज्ञानराधा बँकेतील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडलेले आहेत. या ठेवीदार यांच्याकडून मंत्री बँके शेजारील शाखेतून फॉर्म भरून घेतले जात होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागल्याने आता जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून ऑनलाईन फॉर्म स्वीकारला जात असून खालील पद्धतीने प्रसिध्दी पत्रक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे..

 

प्रसिध्दी पत्रक

 

अवसायक ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांचेवतीने सर्व ठेवीदार व खातेदार यांना आवाहन करण्यात येते की, ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील ठेवीची रक्कम व वेगवेगळया खात्यातील आपले नावे असलेली रक्कम मिळण्याबाबतचे क्लेम नोंदणी अर्ज शाखा जालना रोड, बीड येथे स्विकारणे चालु केलेले आहे. परंतु खातेदार व ठेवीदार खुप मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. आपली गैर सोय होवू नये म्हणुन आपण समक्ष उपस्थित न राहता ज्ञानराधा मल्टीस्टेट च्या ई-मेल dnyanradhaliquidator@gmail.com वर आपला अर्ज पाठविण्यात यावा.

 

अवसायकाकडे यापुर्वी क्लेम बाबतचे अर्ज दिले असतील तर पुन्हा अर्ज पाठविण्याची आवश्यकता नाही. तसेच क्लेमचा कोणताही नमुना नाही तो छापिल असावा असाहि नाही. आपण हाताने ठेवीची माहिती भरुन केला तरी चालेल याची नोंद घ्यावी.

 

दिनांकः-२४ जानेवारी, २०२५

 

ठिकाण:- बीड

 

Co-op Credit ulti State

 

Under Liquidation MOCS/CR 329/2010

 

(समृत जाधव)

 

अवसायक,

 

ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बीड तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड..

 

या ऑनलाईन मेल मध्ये आपला रकमेचा फॉर्म, बँक पासबुक झेरॉक्स फोटो, आधार कार्ड देखील अपलोड करावे….

 

Leave A Reply

Your email address will not be published.