Latest Breaking News Form Maharashtra

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया

‘एकालाही सोडणार नाही..’, वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया

 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल केला आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडावर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी केली होती. या मागणीनंतर आज वाल्मिक कराडावर मकोका दाखल करण्यात आला आहे.

 

तर दुसरीकडे या प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

 

माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे जे कोणीही सहभागी असतील त्यातील एकालाही सोडणार नाही असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आणि एसआयटीने जे काही काम केलं आहे त्यानुसार न्यायालयाने आदेश दिले आहे. तसेच त्यांना कोणत्या गुन्हाच्या आधारे मकोका लावला हे मला माहिती नाही. असं सुरेश धस म्हणाले.

 

पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते ते कायद्याच्या अंतर्गत येतील. या प्रकरणात पोलिस यंत्रणा आहे. जी एसआयटी नेमलेली आहे ते त्यांच काम करत आहे आणि पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते त्यामध्ये येतील. कायद्या पुढे कोणीही मोठं नाही. असं देखील सुरेश धस म्हणाले.

 

तर दुसरीकडे वाल्मिक कराडावर पोलिसांनी मकोका गुन्हा दाखल करताच परळीमध्ये वल्मिक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. बाजारपेठात शुकशुकाट बघायला मिळत आहे. तर बीडमध्ये प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

 

कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका; सुनावणीत नेमके काय घडलं? वाचा सविस्तर

 

खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला खंडणी मागणी प्रकरणात न्यायालयात आज हजर करण्यात आलं. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. तसेच मकोका अंतर्गत कारवाई देखील केली जातेय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य सुत्रधार असल्याचा आरोप केला जातोय. कराडवर मकोका लावण्यात आला असून त्याच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

 

या सुनावणीवेळी न्यायालयात सीआयडी अधिकारी अनिल गुजर आणि सचिन पाटील देखील हजर होते. यावेळी सरकारी वकील जे बी शिंदे यांनी सीआयडीच्या बाजूने युक्तिवाद केलाय. सुनावणीत नेमकं काय-काय झालं ते जाणून घेऊ या. यावेळी सरकारी वकिलांनी 10 दिवसांच्या सीआयडी कोठडीची मागणी केलीय.

 

न्यायालयात आज वाल्मिक कराड यांच्याकडून सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केलाय. ठोंबरे यांनी सांगितलं की, वाल्मिक कराड मागील पंधरा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. अजून कोणता तपास बाकी आहे? असा सवाल त्यांनी केलाय. बॅंक खात्याची चौकशी करण्यासाठी आरोपीची गरज नाही. कराडची 14 गु्न्ह्यांमधून निर्दोष मुक्कता झालीय. मग आता त्या गुन्ह्यांचा तपास करायचा का? असा प्रश्न देखील ठोंबरे यांनी न्यायालयात उपस्थित केलाय. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड दोघे 10 दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात होते. तेव्हा दोघांची एकत्रित चौकशी केली नाही? या 15 दिवसांत पोलिसांनी काय केलं? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय.

 

संतोष देशमुख खंडणी प्रकरणामध्ये आज वाल्मिक कराडला न्यायालयात आणलं गेलं. या प्रकरणात सरकारी वकीलांनी देखील कोर्टात युक्तिवाद केलाय. सरकारी वकिलाने म्हटलं की, ‘आम्हाला वाल्मिक कराडचा हत्येत असलेला सहभाग तपासायचा आहे. त्यामुळे कराडला 10 दिवसांची सीआयडी कोठडी द्या. वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपास अधिकाऱ्यांनी घेतलेय. देशाबाहेर अन् देशात कराडने मालमत्ता जमवली आहे का? याचा तपास आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करण्यासाठी दहा दिवसांची कोठडी द्या, अशी मागणी त्यांनी केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.