Latest Breaking News Form Maharashtra

राजीनामा?? यावर थांबणार का सगळं?

राजीनामा?? यावर थांबणार का सगळं? तर अजिबात नाही..

यासाठी हा लढा नाहीच.. ही सुरूवात आहे.. ज्या मानसिकतेने सरपंच देशमुख यांचा बळी घेतला आहे ती मानसिकता त्या एका बळी पुरती नव्हतीच तर ती मानसिकता हुकुमशाहीची, हम करे सो कायदा, आमचंच राज्य आहे अशी होती..

 

https://www.facebook.com/share/p/1BgtJxxMPb/

ज्या खंडणी मधून या प्रकरणाची सुरूवात झाली त्या प्रकरणाची एक बैठक सातपुडा बंगल्यावर झाली त्या बैठकीला जे जे होते ते ते यात आरोपी पाहिजेत.. अशा कित्येक खंडणीच्या बैठका यापूर्वी झालेल्या असतील, असे अनेक खून पाडले गेले असतील हे ही नाकारता येणारे नाही..

म्हणून राजीनामा पर्यंत हे थांबणार नाही तर याची चौकशी व्हायला हवी, बैठकीतील सहभागी असलेले खंडणी प्रकरणात असतील ते आरोपी व्हायला हवेत.. त्यांचे सीडीआर काढून तपासले पाहिजेत.. जे सहभागी नाहीत त्यांना न्याय व्यवस्थेने नक्कीच सोडून द्यावं मात्र दोषी सुटले पाहिजे नाहीत..

माननीय आ सुरेश अण्णा धस यांनी आज सकाळी विधिमंडळ बाहेर केलेली मागणी राज्याच्या प्रत्येक माणुसकी असलेल्या माणसाच्या मनातील आहे.. फक्त हे राजीनामा पर्यंत न थांबता याचा निरपेक्ष तपास मुख्यमंत्र्यांनी करावा व देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा..

 

या खंडणीच्या पैशाचे व्यवहार तपासावेत, त्याचा उपयोग कुणासाठी होता त्यांनाही आरोपी करावे तेव्हाच खरा न्याय होईल..

 

लेखन :- धनंजय गुंदेकर, बीड 096890 439490

Leave A Reply

Your email address will not be published.