याच तारखेपर्यंत बीडमध्ये सीसीआय शासकीय कापूस खरेदी सुरू असणार, संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली माहिती…
याच तारखेपर्यंत बीडमध्ये सीसीआय शासकीय कापूस खरेदी सुरू असणार, संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली माहिती…

सीसीआय कडून यावर्षी हमीभावाने कापूस खरेदी ही बीड जिल्ह्यात व तालुक्यात करण्यात आलेली आहे. काही काळ सर्व्हर डाऊन असल्याने मध्यंतरी खरेदी थांबली होती. त्यातच आता सीसीआय कडून कापूस खरेदीची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. कापूस हंगाम सण २०२४-२०२५ मध्ये सीसीआय कडून चालु असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती बीडच्या कार्यक्षेत्रातील खरेदी ही १२ मार्च २०२५ पासून बंद होणार असल्याची माहिती संचालक धनंजय गुंदेकर यांनी दिली आहे.

खरेदीची शासकीय तारीख ही १५ मार्च २०२५ असली तरी १३,१४,१५ दिवस हे सुट्टीचे आहेत. त्यामुळे या बाबींची नोंद घेत १२ मार्च पूर्वी कापूस विक्री करावी. ज्या शेतकऱ्यांचा कापूस विक्री करावयाचा राहीलेला असेल त्या सर्व शेतकऱ्यांनी एमआयडीसी मधील सिद्धी ऍग्रो, बहीरवाडी येथे कापूस विक्रीसाठी आणावा.

विक्री वेळी सोबत ७/१२, कापसाचा पिकपेरा, आधारकार्ड इत्यादी आणावे. खरेदीची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत राहील असे आवाहन सभापती श्रीमती सौ. सरला कामराज मुळे व उपसभापती शामसुंदर पडूळे, संचालक धनंजय गुंदेकर व सीसीआय केंद्र प्रमुख श्री. हर्षल पांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

प्रमुख मुद्दे
∆ राज्यात सीसीआय कडून १ कोटी ३८ लाख क्विंटल कापूस खरेदी
∆ कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अंतर्गत ६२ हजार ६२९.४५ क्विंटल खरेदी
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी केंद्राने ७५२१ रुपये असा कापसाला प्रति क्विंटल दर हमीभावानुसार निश्चित केला आहे. मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र ७४२१ असा दर शेतकऱ्यांना मिळत होता. इतर भागापेक्षा कमी दर मिळण्याचे कारण हे आखूड धागा हे सांगितले जात होते. तथापि अचानक ‘सीसीआय’ची खरेदी बंद झाल्याने गेल्या आठवड्यात कापसाचे दर किमान ५०० रुपयाने घसरले होते. खासगी बाजारात सध्या ६९०० रुपये दराने कापसाची खरेदी केली जात आहे.

राज्यात एकूण ३ कोटी ६ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली असून यातली ‘सीसीआय’ने १ कोटी ३८ लाख क्विंटल खरेदी केलेली आहे. यामध्ये बीड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गेल्या महिन्या पर्यंत ६२ हजार ६२९.४५ क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे.

प्रमुख मुद्दे
∆ राज्यात सीसीआय कडून १ कोटी ३८ लाख क्विंटल कापूस खरेदी
∆ कृषी उत्पन्न बाजार समिती बीड अंतर्गत ६२ हजार ६२९.४५ क्विंटल खरेदी
∆ तब्बल ८ दिवसांपेक्षा अधिक काळापासून गेल्या महिण्यात होती खरेदी बंद