2023 खरीप व रब्बी पीकविमा मिळाला मात्र कोणकोणत्या शेतकऱ्यांना??
2023 खरीप पिक विमा यावर्षी गेल्या दोन-तीन महिन्यात वाटप करण्यात आला.. हा पिक विमा प्रत्येक गावातील काही ठराविकच शेतकऱ्यांना मिळाला आहे असा आरोप काही त्याच गावातील शेतकरी करीत आहेत.. त्याच गावातील बऱ्याच शेतकऱ्यांना तो मिळालाच नाही..

शेतकऱ्यांचे दररोज बरेचसे फोन हे पीक विमा 2023 खरीप मिळाला नाही असे येतात.. शेतकरी बांधवांचा फोन आला की माझा त्यांना पहिला प्रश्न असतो..”आपण पिक विमा तक्रार त्यावेळी केली होती का??” तेव्हा पुढून उत्तर येते आठवत नाही, केली नव्हती, केली होती मात्र त्याचा एसएमएस किंवा डोकेट आयडी उपलब्ध नाही.. तर विषय असा आहे 2023 खरीप पिक विमा रक्कम ही त्याच शेतकऱ्यांना मिळालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2023 च्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसावेळी पिक विमा नुकसानीची तक्रार केली होती.. खाली आपणास 27 नोव्हेंबर 2023 रोजीचा मी आवाहन केलेला स्क्रीन शॉट दिलेला आहे..
त्यात स्पष्ट लिहिले होते..आपण ते स्क्रीनशॉट पाहून घ्यावा…तो पुढीलप्रमाणे लिहिला होता…
“महत्वाचे आवाहन…दिनांक 27 नोव्हेंबर 2023
जे तक्रार देतील त्यांनाच यावर्षीचा पीकविमा मिळेल..!! ज्या गावात रात्री पाऊस झालेल्या आहे त्या गावातील शेतकऱ्यांनी कापूस, तूर, खरीप कांदा (standing crop) .. सोयाबीन (harvested) या पिकांच्या नुकसानीची तक्रार पीकविमा तक्रार crop insurance या अॅपवर द्यावी. यामध्ये Unseasonal rain हे नुकसानीचे कारण टाकावे.. ही माहिती आपल्या गावातील, नात्यातील, शेजारील व ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही, जे हा मॅसेज बघू शकत नाहीत त्या शेतकऱ्यांना देखील द्यावी.. तक्रार दिली तरच यावर्षीचा पीकविमा मिळेल अन्यथा 2020 प्रमाणे नुकसान होऊनही वंचित राहावे लागेल.. त्यामुळे जिथे जिथे पाऊस पडला आहे तिथे तिथे आज शेतकऱ्यांनी तक्रारी कराव्यात.. त्यासोबतच रात्रीच्या पावसात रब्बी पिकांचे जे नुकसान झालेले आहे त्याबाबत तलाठी यांना कळवावे.. आपलाच शेतकरीपुत्र धनंजय गुंदेकर.. आपल्या सेवेत 096890 43949 “

हा मेसेज फेसबुक सह शेतकऱ्यांसाठी बनवलेल्या प्रत्येक मंडळनिहाय ग्रुपमध्ये देखील टाकण्यात आला होता, असे आवाहन करण्यात आले होते.. मात्र बरेचसे शेतकरी पिक विमा यावा अशी अपेक्षा ठेवून असतात परंतु पिक विमा नुकसानीचे ऑनलाईन इंटीमेशन म्हणजेच तक्रार करत नाहीत.. जेव्हा आपल्या गावातील काही ठराविक शेतकऱ्यांनाच पिक विमा मिळतो तेव्हा तक्रार न करणाऱ्या शेतकऱ्यांना आपण त्यावेळी तक्रार करायला पाहिजे होती अशी जाण होते..
एकाच गावातील एकाच गटातील जो शेतकरी तक्रार करेल त्याला पिक विमा येतो आणि त्याच गटातील दुसरा शेतकरी जो पीक विम्याची तक्रार करत नाही त्याला पीक विमा मदत मिळत नाही.. हा नियम 2020 पासून आहे मात्र काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करत असल्याने ते पिक विमा मदतीपासून वंचित राहतात.. आज इतक लांबलचक लिहिण्याचे कारण असे आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना 2023 चा पिक विमा आम्हाला का नाही आला असा प्रश्न पडलेला आहे.. पिक विमा मदत ही कशी मिळते? पिक विम्याची तक्रार केल्याशिवाय यापुढे मदत मिळणारच नाही हे बऱ्याच शेतकऱ्यांना अद्याप माहित नाही..
यापूर्वीच्या काळात एकाच वेळी पीक नुकसानीची तक्रार ऑनलाइन रित्या केली जायची मात्र यावर्षीपासून ज्या त्या स्टेजमध्ये पिकाचे झालेल्या नुकसानीची देखील तक्रार करायची होती.. एक गोष्ट मान्य आहे की शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रारी नोंदवताना अनंत अडचणी येतात.. शिकल्या सवरलेला पोरांना देखील ऑनलाईन इंटीमेशन देणे अवघड जाते मग अशिक्षित किंवा अल्प ,अत्यल्प शिक्षित असलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी कशा नोंदवायच्या?? हा प्रश्न रस्ता आहे.. याचसाठी तर रुमणे घेऊन आंदोलने केलेली आहेत मात्र शासन स्तरावर यासाठी सुलभ तोडगा काढायचे सोडा अजून किचकट पद्धतीने नियम बनवण्याचा सपाटाच पिक विमा नुकसानीच्या मदतीमध्ये देण्यात येणाऱ्या तक्रारी संदर्भात लावण्यात आलेला आहे..
या बाबत शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढे यायला पाहिजे मात्र स्वतःच्या बापाच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्याची तयारी देखील बरेच शेतकऱ्यांचे पोरं दाखवत नाहीत.. आता बघा 2024 मध्ये म्हणजेच गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.. आपण ज्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी ऑनलाईन तक्रारी देऊन पिकाचे नुकसान पिक विमा कंपनीस कळवले.. त्याचा सर्वेही झाला.. मात्र अद्याप देखील 2024 अग्रीम आणि उर्वरित पिक विमा वाटपाच घोडं कुठं अडलं आहे हे कळायला मार्ग नाही..
प्रशासन व सरकार यात उदासीन असताना आपण देखील कुठं याबद्दल सजग आहोत, आवाज उठवत आहोत असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे.. मी व माझे सहकारी दुसऱ्या फोटोत असल्याप्रमाणे कधीही शेतकऱ्यांच्या प्रश्न आवाज उठवण्यासाठी, रस्त्यावरच्या आंदोलनात कधीही सहभागी असतो मात्र प्रत्येक शेतकऱ्याने देखील याचा विचार करायला हवा.. आपल्यावर अन्याय होतोय आपण बोललं पाहिजे.. किती दिवस शांत राहणार???
धनंजय गुंदेकर, बीड
9689043949