Latest Breaking News Form Maharashtra

तुमच्या कुटुंबातील किती जणांना मिळणार पीएम किसान लाभ? पीएम किसान निकष बदलले, काय आहेत अपात्रतेचे नवीन नियम??

 

तुमच्या कुटुंबातील किती जणांना मिळणार पीएम किसान लाभ? पीएम किसान निकष बदलले, काय आहेत अपात्रतेचे नवीन नियम??

 

पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नियमावलीत बदल केला असून, नवी नियमावली लागू केली आहे. त्यानुसार आता या योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

 

नोकरदार, डॉक्टर, वकील, इंजिनीअर, पेन्शनर, आयकर भरणारे लाभार्थी कायमस्वरूपी वगळण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थी वर्गवारीनिहाय पडताळणी करण्याची प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यात तालुकास्तरावर मोहिम स्वरूपात चालू आहे.

 

अपात्रतेचे हे आहेत निकष

 

एकाच कुटुंबातील लाभार्थी (पती-पत्नी १८ वर्षांखालील अपत्य वगळून), राज्याचा रहिवासी नसलेले लाभार्थी, संविधानिक पदावरील व्यक्ती, माजी संविधानिक पदावरील व्यक्ती, केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था निमशासकीय कर्मचारी, जमिन विक्रीमुळे भूमीहिन लाभार्थी, संस्था मालकी असलेल्या जमीनधारक, नोंदणीकृत व्यवसायिक, सलग ३ वर्ष आयकर भरणारे लाभार्थी, स्वतः लाभ समर्पित केलेले लाभार्थी, वयोवृद्ध, सेवा निवृत्तीधारक लाभार्थी, जमिनीची मालकी स्वतः नावे नसलेले लाभार्थी, दुबार नोंदणी असलेले, शेती शिवाय इतर कारणासाठी वापरणारे जमीनधारक, अनिवासी भारतीय, खोट्या माहितीद्वारे नोंदणी केलेले लाभार्थी, अपात्र ठरतील, असे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.