शेतकरी बंधुंनो, ऍग्रीस्टॅक योजनेत फॉर्मर आयडी बनवला नाही तर काय काय होणार नुकसान? पहा शासनाची सविस्तर सूचना..
शेतकरी बंधुंनो, ऍग्रीस्टॅक योजनेत फॉर्मर आयडी बनवला नाही तर काय काय होणार नुकसान? पहा शासनाची सविस्तर सूचना
सर्व ७/१२ धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते कि, अॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला ७/१२ आधारला लिंक करावयाचा आहे. जेणेकरुन तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. राज्य सरकारने याबाबत जाहीर सूचना प्रसारित केलेली असून या योजनेत फॉर्मर आयडी देण्यात येणार आहे. ज्याव्दारे भविष्यातील सर्व योजनांचा लाभ तुम्हाला याव्दारे घेता येईल. जर आपण आपला फार्मर आयडी बनविला नाही तर आपल्याला पुढील योजनेचा लाभ मिळणार नाही.

• PM किसान योजनेअंतर्गत हप्ते मिळविण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य.
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे हप्ते मिळण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आलेला आहे. या आयडी सोबत हप्ते लिंक करण्यात येणारं आहेत, त्यामुळे हा आयडी असणे आवश्यक आहे. हा आयडी नसेल तर या योजनेतील हप्ते मिळण्यास देखील अडचण येऊ शकते.
• शेतकऱ्यांना डिजीटल पीक कर्ज (KCC)
जेव्हा आपण बँकेतून पीककर्ज घेणार तेव्हा हा आयडी त्यात मेंशन करण्यात येणार असल्याचे कळते आहे. एका आयडी वर आपला शेती संबंधी सर्व डेटा त्यात असेल.
त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात हा आयडी उपयोगी असणार आहे..
• (DBT) साठी फार्मर आयडीचा उपयोग होईल. विविध योजनांचा सुरू असलेला लाभ, घेतलेला लाभ या सर्व बाबी यात रेकॉर्ड होणार आहेत..
तसेच सुधारित माहिती मिळणार, हवामान डेटा, मृदा आरोग्य माहिती, पिकांबद्दल सल्ला.
त्यासाठी जवळच्या महा-ई सेवा/CSC/सेतू केंद्रामध्ये जाऊन आपला ७/१२ ला आधार लिंक करुन घ्यावे व फार्मल आयडी बनवून घ्यावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे.
त्यासाठी खालील कागदपत्रे सोबत घेन जावेत.
१. आधारकार्ड.
२. आधार लिंक मोबाईल क्रमांक.
३. सर्व ७/१२ व ८-अ उतारे.
(टिप- आपला मोबाईल क्रमांक आधारकार्डशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.)