बीड जिल्ह्यातील इतक्या शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा..
जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी या शेतकऱ्यांच्या अग्रीमसाठी मंजूरी दिली आहे. काही दिवसांपूर्वी दिशा कमिटीची बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती, त्यात अग्रिम पीकविमा हा मुद्दा त्यांनी मांडला होता. संचालक धनंजय गुंदेकर यांचा पाठपुरावा अन् खासदारांनी या मुद्द्याला दिलेले महत्व यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालत अग्रिम मंजुरी दिली आहे.
खालीलप्रमाणे तालुका निहाय शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे.
बीड ९३७१६,
अंबाजोगाई ५५७१४
आष्टी १९४४३
धारूर ३८७३२
गेवराई १५३६८४
केज ६५५९३
माजलगाव ६५४१५
परळी ५६६१४
पाटोदा २६३४५
शिरूर ५३००२
वडवणी ३१४६६
याप्रमाणे शेतकऱ्यांना खरीपातील अग्रीम मिळणार आहे. मंजूर करण्यात आलेले अग्रीम मुग, उडीद, सोयाबीन, कापूस आणि तूर या पीकांना लागू करण्यात आले आहे. येत्या २० ते ३० दिवसांत सदर रक्कम खात्यावर येणे अपेक्षित आहे. जर ही रक्कम वर्ग करण्यात आली नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल असं संचालक धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.