ई-पीक पाहणी करा, आज शेवटचा दिवस; प्रशासनाची धावपळ
बीड: ई-पीकपाहणी करून घेण्यासाठीची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी होती परंतु २ मार्चपर्यंत मुदत वाढ दिल्याने शेतकऱ्यांनी आपली ई-पीक पाहणी करून घेणे आवश्यक आहे. या अनुषंगाने बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विविध केल्या. तसेच अॅग्रीस्टॅकच्या कामासाठी क्षेत्रीय स्तरावर गावोगावी फिरून काम करण्याबाबतचा आदेश दिला.

जिल्ह्यात सध्या ई-पीकपाहणी, अॅग्रीस्टैंक इत्यादी कामाची लगबग पाहायला मिळत आहे. तहसीलदार शेळके यांची मागील आठ दिवसांपासून या कामाचा मोठ्चा प्रमाणात पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी स्वतंत्र आदेश काढून २४ ते २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल सेवक, कोतवाल यांनी ई-पीक पाहणी आणि अॅग्रीस्टॅकच्या कामासाठी क्षेत्रीय स्तरावर गावोगावी फिरून काम करण्याबाबत लेखी आदेश काढले. ईपीक पाहणीला दोन दिवस मुदत वाढल्यामुळे शुक्रवारी सायंकाळी बैठक

२ मार्चपर्यंत पाहणीला दिली ई पीक मुदतवाढ आहे
घेऊन पुन्हा दोन दिवसात ई-पीक पाहणीवर पूर्ण लक्ष देण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी यांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व अधिकाऱ्यांनी पीक पाहणीचे काम केले. निवासी नायब तहसीलदार सुहास हजारे, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, नायब तहसीलदार प्रशांत आधवर, प्रशांत सुपेकर, मंडळ अधिकारी बाबासाहेब तांदळे, तलाठी शरद घोडके हे गावोगावी शेतात फिरत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महसूल विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.