सर्वांसाठी घरे…हे उद्दिष्ट साध्य व्हावं.. घोषणा ह्या घोषणा राहू नयेत .
■ “सर्वांसाठी घरे” हे उद्दिष्ट येत्या पाच वर्षात साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार…

■ राज्यात प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनमन या केंद्र पुरस्कृत तर रमाई आवास, शबरी आवास, आदिम आवास, पारधी आवास, अटल बांधकाम कामगार वसाहत, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास, मोदी आवास तसेच धर्मवीर आनंद दिघे घरकुल या योजना; या योजनेअंतर्गत एकूण ४४ लाख ७ हजार घरकुल मंजूर करणार…

■ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत सन २०२४ -२५ करिता २० लाख घरकुलांच्या उद्दिष्टांपैकी सुमारे १८ लाख ३८ हजार घरकुलांना मंजुरी; १४ लाख ७१ हजार लाभार्थीना पहिल्या हप्त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपये वितरीत…
■ ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर…
■ लोकप्रतिनिधी आणि लाभार्थीच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार…
या सर्व घरकुलांच्या छतावर सौर ऊर्जा संच बसविण्यात येणार…