Latest Breaking News Form Maharashtra

विशेष लेख…हरल्यावर पण हसता आलं पाहिजे…!!

हरल्यावर पण हसता आलं पाहिजे…!!

फायनल न्युझीलंड टीम सोबत म्हटलं की हा चेहरा आठवला.. केन विलियमसन.. २०१९ मध्ये जगज्जेती टीम निवड ही वादग्रस्त ठरली..न्युझीलंड पराभूत ठरविण्यात आले.. विजय हिसकावून घेतला गेल्याची भावना त्यावेळी न्युझीलंड टीम अन् देशाची झालेली असू शकते.. मात्र तरीही खिलाडूवृत्ती असलेल्या केनने हसत तो पराभव स्वीकारला.. त्यावेळचे त्याचे फोटो जगभरात पोहोचले.. इंग्लंडच्या विजयापेक्षा केनच्या स्माईलने भाव खाल्ला.. हा माणूस त्यामुळं ग्रेट झाला होता.. 

 विल्यमसन ने 2019 च्या वर्ल्डकप मध्ये न्यूझीलंडचे नेतृत्व केले आणि दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध अनेक खेळी खेळल्या.. आपल्या विरुद्धच्या सेमीफायनल मध्येही त्याने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावल्यामुळे न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एकाला पराभूत केले.. न्यूझीलंडला तो अंतिम सामना ‘अत्यंत फरकाने’ गमवावा लागला आणि किवी कर्णधाराने हसतमुख चेहऱ्याने “आपले नशीब स्वीकारले…” 10 सामन्यांत 578 धावा केल्याबद्दल त्याला 2019 विश्वचषकासाठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट म्हणून देखील गौरविण्यात आले होते… 

कालच्या सामन्यात केन एव्हढी काही कमाल करू शकला नाही.. हा माणूस कर्तुत्ववान आहे मात्र या माणसाला नशीबाची साथ नाही.. काल आऊट झाल्यावर खरंतर आनंद झाला.. ट्रॉफी आपल्याला पाहिजे होती.. आपल्या विरुद्ध केन खूप चांगली बॅटिंग करतो.. त्याची बॅटिंग चालणे म्हणजे आपण पराभूत होणे.. विजयी टीम लक्षात ठेवली जाते पराभूत नाही.. केन सारखंच नशीब त्यांच्या सेंटनर नावाच्या नवीन कॅप्टनचे देखील आहे.. फायनल मध्ये पराभव आता न्युझीलंड साठी नवीन बाब राहिलेली नाही..

सामन्यानंतर विराट कोहली जेव्हा मीडिया मध्ये बोलत होता त्यावेळी त्यांनं एक वाक्य खूप महत्वाचं बोललं.. खरंतर ते इंग्रजीत होतं मला तोडकंमोडक समजलं.. आज आमचा विजय झाला आहे आम्ही खुश आहोत.. यापूर्वी त्यांचा विजय झाला होता ते खुश होते.. हार जीत होतच असते.. खेळाप्रती प्रेम ठेऊ.. असं जेव्हा आपला कोहली म्हणाला तेव्हा पुढं तो पराभवानंतरही हसणारा चेहरा मला आठवला .. 

केन विलियमसनचा….🙏🏏🏏

 

धनंजय गुंदेकर, बीड

09689043949

 

 

 

https://www.facebook.com/share/p/1BotfmQS4e/

Leave A Reply

Your email address will not be published.