कथित लॉबी कडून शिळ्या कडीला ऊत..!! भाग ०१
आमच्या ग्रामीण भागात म्हण आहे.. एखादा विषय काही काळापूर्वी होऊन गेल्यानंतर त्याबाबत वर्तमान काळात उगाच रटाळ विषय लाऊन धरायचा.. तोच तोच विषय चघळत बसायचं अन् मुख्य विषयाला बगल द्यायची म्हणजेच शिळ्या कडीला ऊत आणायचा.. मस्साजोग आदर्श सरपंच देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून फोकस हटवण्यासाठी जिल्ह्यात अन् एव्हाना राज्यात एक कथित लॉबी मोठ्या तयारीने सक्रिय झाली आहे..

जे जे सरपंच देशमुख यांच्या हत्येत न्याय मागण्यासाठी पुढं आले त्या सगळ्या नेत्यांना हळूहळू टार्गेट केले जात असल्याचं दिसत आहे.. यामध्ये आ सुरेश अण्णा धस, आ प्रकाश दादा सोळंके अन् आ संदीप भैय्या क्षीरसागर यांना टार्गेट करण्याचा सपाटा लावला आहे.. सुरूवात झाली आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातून.. खोक्या भोसले हा कथित गुन्हेगार कसा आ सुरेश अण्णा धस यांचा “कराडसारखा आका” आहे असं रंगविण्यापासून ..!!!! बघा काय जमाना आलाय, लोकहो..!! अगदी काल परवा त्या खोक्याने माझ्यावरच २०२१-२२ मध्ये आ सुरेश अण्णांनी अंमळनेर ठाण्यात माझी चूक झाल्यानंतर गुन्हा दाखल केल्याचे टिव्ही ०९ वाहिनीवर live येत सांगितले अन् त्या कथित लॉबीची हवाच काढून घेतली..

मात्र भोसले प्रकरणात आ सुरेश अण्णांना सह आरोपी करा पर्यंत मागण्यांची मजल जाताना त्यात अनेक ठिकाणी जातीवाद उफाळून आल्याचा दर्प दिसला.. त्या मागणीत कोणता राग होता हे न कळणारी जनता नाही..!! त्या खोक्या भोसलेंच्या कृत्याचे अजिबात समर्थन केले जाणार नाही.. तो माणसांना अमानुष मरहणार करत असेल किंवा जनावरांचा बळी घेत असेल तर त्यावर कडक कारवाई व्हावी पण इकडं माणसं थेट हालहाल करून मारून टाकणाऱ्यांचे काहींनी समर्थन केले त्याचं काय???? राज्यातील जनतेने क्रूरपणे माणूस मारणाऱ्या आरोपींच्याच पाठीशी कुणीतरी उभा राहिलेले पाहिले आहे हे अजिबात विसरणार कृत्य नाही.. आता आ सुरेश अण्णांना सह आरोपी करा म्हणणारेच तर ते नव्हते ना? असा प्रश्न पडतोय कारण तीच तीच नावं पुढं दिसत आहेत..
तिन्ही नेत्यांच्या मागे कोण लागलंय हे कळत आहे.. कुठल्याही गुन्ह्यांच मला समर्थन करायचं नाही.. जो चुकला तो चुकलाच मग तो कुणीही असो.. त्याला सुट्टी नसलीच पाहिजे.. मात्र एकाचवेळी तिन्ही नेत्यांच्या जवळच्या लोकांनी केलेल्या चुका कसकाय पुढं यायला लागल्या अन् त्याच्या मागे कोण आहे हे कळत नाही असं कसं शक्य आहे… भोसले प्रकरणात काहीच होईना या मानसिकतामधून ती कथित लॉबी सुसाट सुटली पुन्हा बीड कडे.. त्यांचं दुसरं टार्गेट होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर.. एकामागून एक दोन तीन व्हिडिओ – ऑडियो त्यांचे व्हायरल करण्यात आले.. त्यात ते कसे चुकीचे आहेत हे दाखवण्यात आले.. आधी त्यांच्या पिए ने मॅनेजरला मारहाण केल्याचे दाखवले.. नंतर त्यांचा ऑडियो…….
पुढचा भाग 2 थोड्याच वेळात….
धनंजय गुंदेकर, बीड
096890 43949