Latest Breaking News Form Maharashtra

नमो शेतकरी महासन्मान ६ वा हप्ता कधी जमा होणार? अपडेट आली समोर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती…!!

अनेक शेतकरी विचारीत असतात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतला सहावा हप्ता कधी जमा होणार? पंतप्रधान सन्मान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे मात्र नमो शेतकरी हप्ता खात्यात कधी येईल याची विचारपूस सातत्याने शेतकऱ्यांमधून सुरू असते याच अनुषंगाने काल एक मोठी अपडेट समोर आली असून या हप्त्यापोटी राज्य सरकारने १६४२ कोटी रुपयांचा निधी लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी अदा केला आहे…

 

याचा शासन निर्णय निर्गमित केला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत, सहावा हप्ता (माहे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५) व यापूर्वीच्या हप्त्यांमधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रू.१६४२.१८ कोटी इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे..

या हप्त्याच्या वितरणानंतर नमो शेतकरी सन्मान सहावा हप्ता लवकरच मिळेल असे दिसते आहे.. याची अधिकृत तारीख अद्याप देखील राज्य सरकारने जाहीर केलेली नाही मात्र कृषी विभागातील सूत्रांकडून तारखेसंबंधी काही अपडेट समोर येत असून दिनांक 29 मार्च पूर्वी हा नमो महासन्मान हप्ता वितरित होऊ शकतो अशी शक्यता आहे..

हे अधिकृत तारीख नाही मात्र शक्यता असल्याचे सूत्रांकडून कळते आहे.. ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्मान निधीचा हप्ता येतो त्याच शेतकऱ्यांना नमोचा देखील हप्ता मिळणार आहे.. बीड जिल्ह्यातून शेतकऱ्यांची प्रचंड उत्सुकता होती, आता या सर्व शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे…

 

धनंजय गुंदेकर, बीड

Leave A Reply

Your email address will not be published.