Latest Breaking News Form Maharashtra

घरकुल, विहीर, गायगोठा, फळबाग लाभार्थ्यांनो मजुरी रक्कम वाढली.. मात्र..

घरकुल, विहीर, गायगोठा लाभार्थ्यांनो ह्या बातमीकडं लक्ष द्या.. रोजगार हमी मजुरीत फक्त 15 रुपयांची वाढ अन् तिकडे खासदारांना 24% खिरापत.. आरं वारं वाह सरकार.. ह्यो तर भेदभाव झाला ना….

वाढती महागाई पाहता केंद्र सरकारने नुकतेच खासदारांचे वेतन 24 टक्क्यांने वाढवले मात्र दुसरीकडे मजुराचे वेतन वाढवण्याकडे कंजूसपणा केला….विहिरी, रस्ते, गायगोठा, घरकुल, फळबाग लागवड ही रोहयो मधून होतात.. 

मोठ्या संख्येने मजुरांची संख्या विविध कामांना आवश्यक असते.. मात्र या मजुरांना मजुरीच खूप कमी रोजगार हमी योजनेतून मिळते आहे.. सामान्यतः शेतकऱ्याच्या इथे कामाला गेल्यावर पुरुषाला सहाशे रुपयांपेक्षा अधिक मजुरी आहे मग एवढ्या कमी रकमेत रोजगार हमी योजनेत काम करायला मजूर तयार होत नाही..

रोजगार हमीचे पैसे देखील वेळेवर मिळत नाहीत.. काम केल्यापासून कामाचे दाम हे किमान सहा महिने वाट बघावी लागते अशी परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यातील विविध पंचायत समितीमध्ये अनुभवास आलेले आहे..

 महाराष्ट्रामध्ये रोहयोवरच्या मजुरांना फक्त 15 रूपयाची वाढ करण्यात आली. पुर्वी 297 रुपये होते. आता 1 एप्रिलपासून 312 रूपये मजुरांना मजुरी मिळणार आहे. देशात सर्वाधिक मजुरी हरयाणा राज्यात 400 रुपये करण्यात आली…. 

राज्यासह देशात हजारो मजुर रोहयोवर काम करतात. या मजुरांना योग्य मजुरी मिळणे गरजेचे आहे. तुटपूंजी मजुरी वाढवून मजुरांच्या तोंडाला शासनाने पाने पुसण्याची कामे केली…

Leave A Reply

Your email address will not be published.