पीएम घरकुल आवास योजनेचे नवीन टार्गेट आले बीड जिल्ह्यात विक्रमी संख्येने घरकुल बांधण्यात येणार..!! पहा आकडा…
पीएम घरकुल आवास योजनेचे नवीन टार्गेट आले बीड जिल्ह्यात विक्रमी संख्येने घरकुल बांधण्यात येणार..!! पहा आकडा…
बीड (प्रतिनिधी) : सर्वसामान्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे नवीन टार्गेट आले असून जिल्ह्यामध्ये ५१ हजार ७८४ घरे बांधण्यात येणार.
प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला मिळणार हक्काचा निवारा
हक्काचा निवारा असावा यासाठी दरवर्षी घरकुल बांधण्यात येतात. प्रधानमंत्री आवाज योजनेसह इतर योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले जातात. यापुर्वीचे टार्गेट झाल्यानंतर आता नवीन टार्गेट जिल्ह्यासाठी आले आहे. जिल्ह्यात ५१ हजार ७८४ घरकुल बांधण्यात येणार आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात ४ हजार ७४१
आष्टीत ६ हजार १५७
बीड तालुक्यात ८ हजार ८९२
धारूर ३ हजार ८३
गेवराई ७ हजार ७१०
केज ५ हजार ६०५
माजलगाव ४ हजार ७२६
परळी ४ हजार २४१
पाटोदा २ हजार ८४०
शिरूर कासार २ हजार ७५२
वडवणीसाठी १ हजार ७३७ घरकुलचे टार्गेट आले आहे.