माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पुण्यातील लोकं झोपेतून उठण्याआधीच काँग्रेसला रामराम ठोकला.. त्यांच्या पोट निवडणुकीतील विजयाचा धंगेकर पॅटर्न खूप गाजला होता.. पुणेकरांच्या प्रश्नांवर जिवाचं रान करणारा नेता म्हणून धंगेकर यांनी महाराष्ट्रभरातून ओळख कमावली..
सामान्य परिस्थितीतून पुढं आलेलं हे नेतृत्व काँग्रेसला सांभाळता आलं नाही की या नेतृत्वाने सत्तेची गरज ओळखून पावले बदलली हा संशोधनाचा विषय आहे.. मात्र काँग्रेस कात टाकत होती अशा अवस्थेत धंगेकर हे काँग्रेसला सोडून सत्तेला जवळ करत आहेत.. पुण्यात सध्या गुन्हेगारी सह अनेक समस्या वाढत्या लोकसंख्येने आणल्या आहेत..
लोकांची जगण्याची पद्धत अन् पुणे हे संघर्षाचं ठिकाण झालेलं असताना धंगेकर यांच्यासारखे नेतृत्व या ठिकाणी निर्माण झाले होते.. काँग्रेस साठी हा चेहरा आश्वासक होता.. पोटनिवडणुकीतील ऐतीहासिक विजयानंतर पुण्याच्या काँग्रेस मध्ये जीव आला होता… याचं बरचसं श्रेय त्या पोट निवडणुकीच्या यशाचे होते..
काँग्रेस पुण्यात धंगेकर नंतरही जिवंत राहील, यशस्वीही होईल मात्र त्यात आता धंगेकर सारखी चांगली माणसे नसतील, धंगेकरांना संघर्षाचा हात सोडून सत्ता आवश्यक असल्याने त्यांनी सत्तेचा बाण स्वीकारणं पसंत केलं असं म्हणावं लागेल .
काँग्रेस का सोडत आहेत?? या प्रश्नांची अनेक उत्तरे आहेत.. धंगेकरांना पोट निवडणुकीतील विजय लोकसभेच्या निवडणुकीत राखता आला नाही एव्हाना तो त्यानंतरच्या विधानसभेतही टिकला नाही.. पद, सत्ता आवश्यकच असते.. मात्र संघर्ष किती दिवस करायचा असाही प्रश्न धंगेकर यांना पडलेला असू शकतो..
पुण्यात काही अन्याय ग्रस्त विषय झाले की रवींद्र धंगेकर आठवतात.. या माणसानं स्वतःच तेवढं वलय बनवलं होतं अन् आहे देखील.. काँग्रेस सोडून ज्या शिवसेनेची साथ देत आहेत त्या शिवसेनेने या माणसाला तेवढी संधी द्यावी.. अन्यथा आस्मान से गिरे और खजूर में अटके असं होऊ नये म्हणजे मिळवलं…
धनंजय गुंदेकर, बीड
096890 43949