Latest Breaking News Form Maharashtra

चला नैतिकतेचे बोलू…

चला नैतिकतेचे बोलू…

राजीनामा रडू रडू देताना वैद्यकीय कारण देणाऱ्या मंत्री महोदयांच्या पक्षाने राजीनाम्याचे कारण नैतिकता असलेले सांगितले.. देणारा वैद्यकीय कारण सांगतो अन् पक्ष नैतिकता?? आहे का नाही विरोधाभास..! हे सर्व घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी २ प्रकार व्हिडिओ द्वारे समोर येतात..

भोकरदन तालुक्यातील अन्वा येथे एका युवकाला काही जण मिळून सळईने चटके देतात.. ही घटना अतिशय गंभीर असून यातील आरोपींना मोक्का लावला पाहिजे असं तो व्हिडिओ पाहताक्षणी वाटतेच..

मी अन् माझ्यासारखे माणुसकी जिवंत असलेले प्रत्येक जन तो व्हिडिओ पहिल्यापासून तेच म्हणत असेल.. ही बाब एव्हाना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचली अन् माणुसकी असलेल्या या नेत्याने त्या तरुणाचा सर्व उपचार अन् आरोपींवर मकोका लावण्याची तयारी केली.. ही आहे खरी नैतिकता..!

आरोपी अमुक २ जातीचे आहेत, त्यात आपला एक आहे याचा विचार त्यांनी अजिबात केला नाही.. त्या घटनेत जे जे सहभागी असतील त्यांना अजिबात आपला तुपला म्हणण्यासारखे नाही. ते नराधम आहेत त्यांना सजाच हवी अशी भूमिका शिंदेंनी घेतली.. त्यातून त्यांची नैतिकता दिसते..!!

दुसरा व्हिडिओ आला शिरूर कासार, आष्टी विधानसभा क्षेत्रातील.. खाक्या भोसले यान एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा.. तो व्हिडिओ दिड वर्षांपूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे.. मात्र हा व्हिडिओ समोर येताच आ सुरेश अण्णा धस यांचा तो कार्यकर्ता असल्याचे देखील मीडियात आले..

लागलीच आ सुरेश अण्णांनी समोर येत तो कार्यकर्ता जरी माझा असला तरी त्याच्या विरुध्द कुणी या मारहाणीबद्दल फिर्याद घेऊन येत असेल तर ती दाखल करून घ्यावी असं आवाहन केले. तो माझा आहे म्हणून त्यांना वाचवा असं काहीही ते म्हणाले नाहीत.. जो चुकला त्याला शिक्षा व्हावी अशी आ सुरेश अण्णांची भूमिका..

मार देणारा अन् मार खाणारा हे दोन्ही आ सुरेश अण्णा ज्या जातीचे आहेत त्या जातीचे नाहीत.. जात लिहिण्याचे कारण असं की आता आरोपी अन् गुन्हेगार यांच्या जातीवरून कुणाला समर्थन द्यायचे हे ठरते.. अनवा येथील घटनेत मारेकरी २ जातीचे होते.. अन् शिरूर मधील व्हिडिओ मध्ये देखील मारेकरी २ जातीचेच होते..

शिरूरच्या घटनेत मारेकरी भोसलेने मारहाणीचे कारण हे मित्राच्या बायकोची छेड काढली म्हणून मारहाण केल्याचं म्हटलं आहे.. याची सत्यता त्यात तक्रार दाखल झाल्यानंतर होईलच.. मात्र तूर्तास एवढ लांबलचक पसारा लिहीत असताना नैतिकता काय असते हेच सांगायचं होतं..
आरोपी माझ्या समाजाचे आहेत म्हणून समर्थन देणारे टोळके या दोन्ही प्रकरणात पुढे आले नाही मात्र दुर्दैवाने सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना वाचविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चे धडकले, आंदोलने झाली, उपोषणे झाली, उघड उघड राजकारणी, समाजसेवक, डॉक्टर्स, वकील यांनी बाजू घेतली, याउपर जाऊन चक्क महंत देखील आरोपींच्या बाजूने बोलले..

हे बोलावे लागेल कारण नैतिकता कुणाला आहे अन् कुणाला नाही हे मांडलं पाहिजे.. आपला म्हणून गुन्हा लपवण्याच काम कुणी केलं हे राज्याने अन् देशाने पाहिले आहे.. हे असले पांचट कामं आम्ही करणार नाही..

जिवंतपणी चटके देणाऱ्या त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे यासाठी वेळ प्रसंगी आम्ही आंदोलन करू.. नैतिकतेचा विषय निघालाच आहे तर आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ सुरेश अण्णा धस यांच्या नैतिकतेला सलाम करू..

कुणी नैतिकता पदासाठी पायी तुडवली याचा प्रश्न आता वाचकाने स्वतःशी करावा.. याउपर कॉमेंट मध्ये नैतिकता पायदळी तुडवनाऱ्यांची बाजू घ्यायला कुणी आले तर त्याचीही नैतिकता किती आहे हे ज्यांन त्यांन ओळखून घ्यावं.. बाकी सरपंच देशमुख यांच्या प्रकरणावरून फोकस हटणार नाही, एवढं ध्यानात असू द्या…!!

धनंजय गुंदेकर, बीड
096890 43949

Leave A Reply

Your email address will not be published.