Latest Breaking News Form Maharashtra

बोगस पिकविमा घोटाळा; कारवाईंच्या हालचाली सुरू

बोगस पिकविमा घोटाळा; कारवाईंच्या हालचाली सुरू

 

3 हजार हेक्टर शासकीय जमिन स्वतःची दाखवली, 240 सीएससी केंद्रे, 565 शेतकरी दोषी – जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल  

 

सध्या राज्यभरात बोगस पीकविमा घोटाळा प्रचंड गाजत आहे. आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात याबाबत आवाज उठवला, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने चौकशी सुरू केली. पीकविमा कंपनीकडून घोटाळा करणाऱ्यांची माहिती समोर आली. 

राज्यातील परळी व इतर तालुक्यातील csc केंद्रांवरून राज्यभरातील शासकीय जमिनींवर पीकविमा भरण्याचा प्रकार आ सुरेश धस यांनी पुढे आणला. आकड्यांमधून असा प्रकार राज्यात अनेक ठिकाणी घडल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये एकट्या धाराशिव जिल्ह्यातील बोगस पिकविमा घोटाळ्यात 565 शेतकरी दोषी असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सादर केला आहे. या शेतकऱ्यांनी शासकीय 2,994 हेक्टर जमीन स्वत:ची असल्याचे दाखवून 1,170 अर्जांद्वारे बोगस पीकविमा काढला होता. सरकारने या विम्यासाठी 3.13 कोटी रुपये भरले. तपासणीत बीड आणि परभणीतील शेतकऱ्यांचा सहभाग आढळला. यापूर्वी 24 ऑनलाइन केंद्र चालकांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता शेतकऱ्यांवर गुन्हा नोंदवला जाणार का, याकडे लक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.