अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, (आर्टी) मुंबई यांच्या मार्फत कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागांतर्गत मातंग समाजातील युवक युवतीसाठी मोफत प्रशिक्षण व नोकरीची सुवर्णसंधी.!
अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था, (आर्टी) मुंबई यांच्या मार्फत कौशल्य विकास व प्रशिक्षण विभागांतर्गत मातंग समाजातील युवक युवतीसाठी मोफत प्रशिक्षण व नोकरीची सुवर्णसंधी.!
मातंग आणि त्यातील तत्सम जातींचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापन करण्यात आली आहे. मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पुर्व प्रशिक्षण, योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
प्रशिक्षणासाठी उपलब्ध कोर्सेस
स्पर्धा परीक्षा : एमपीएससी, युपीएससी, बँक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/सेट, पोलीस /मिलीटरी.
कौशल्य विकास : परदेशात नोकरी व शिक्षणाची संधी, शेतीपुरक व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस.
योजना : पीएच. डी, पोस्ट पीएच. डी संशोधनासाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप)
नाव नोंदणी करण्याची मुदत :- १५ फेब्रुवारी २०२५ पर्यत
सविस्तर माहीतीसाठी आर्टी संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी: https://arti.org.in यावरती करियर ऑपशनमध्ये जाऊन आपला फॉर्म भरावा.

या संधीचा लाभ घेण्यासाठी लिंक: https://arti.org.in/arti-job