Latest Breaking News Form Maharashtra

बीड शहरापर्यंतची हायस्पीड रेल्वे तपासणी तारीख ठरली; रेल्वे आयुक्तही येणार आहेत

बीड शहरापर्यंतची हायस्पीड रेल्वे तपासणी तारीख ठरली; रेल्वे आयुक्तही येणार आहेत

 

बीड जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न आता पूर्णत्वाकडे जात आहे. मागील काही वर्षापासून रेल्वे कामाची मंदावलेली गती दूर झाली असून कामास आता वेग आला असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आता पुढील टप्पा पार पडत आहे. ४ फेब्रुवारी रोजी विधनवाडी ते राजुरी आणि ५ फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड या मार्गावरील रेल्वे लोहमार्गाची जलदगती चाचणी पार पडणार आहे. त्यामुळे संबंधित चाचणीलगत येणाऱ्या गावकऱ्यांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे, तसेच गुरे, पाळीव प्राणी इत्यादी चाचणी दरम्यान रुळावर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. लोहमार्गालगत चाचणी दरम्यान कोणीही वावरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधीचे पत्र उपजिल्हाधिकारी समन्वय यांनी पाटोदा, बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहे.

 

विघनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी ४, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही कळविले आहे.

 

 

दरम्यान, मागील काही दिवसांपासून बीड शहरानजीक इंजिनद्वारे नियमितपणे चाचणी घेतली जात आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. आता जलदगती चाचणीची तयारी रेल्वे विभागाकडून करण्यात आली आहे.

 

रेल्वे आयुक्त करणार सुरक्षेची तपासणी

 

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा व सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा हे ३ ते ६ फेब्रुवारी दरम्यान पुणे विभागातील विविध रेल्वे स्थानकांची तपासणी करणार आहेत. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी विगनवाडी ते राजुरी स्थानकांदरम्यानची तपासणी, ५ फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड स्थानकांदरम्यानची तपासणी, ६ फेब्रुवारी २०२५ बीड येथून तपासणी पूर्ण करून ते परतणार आहेत.

वेगाने काम आहे सुरू

 

परळी-बीड-अहिल्यानगर या वर्षांपासून सुरू आहे. नागर या

 

● मागील तीन ते चार व २ वर्षांपासून रेल्वे कामास गती मिळत असल्याचे दिसून येत आहे. एक-एक टप्पा पूर्ण होत असून रेल्वे काम आता गती घेत असल्याचे दिसून येत आहे.

 

यापूर्वी ५ जानेवारी २०२४ रोजी आष्टी ते अंमळनेर या ३० किलोमीटरच्या मार्गावर ११० किलोमीटर प्रति तास या वेगाने हायस्पीड चाचणी घेण्यात आली होती.

 

४ विधनवाडी ते राजुरी या नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी ३० ते ३१ डिसेंबरदरम्यान घेण्यात आली होती.

 

चालू वर्षांत कामाने गती प्राप्त • केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी विघनवाडीपर्यंत रेल्वे चाचणी घेण्यात आली होती.

 

त्यानंतर ३० ते ३१ डिसेंबर रोजी 3 चाचणी पार पडली होती. आता पुढील चाचणीचा टप्पा पार पडत आहे. त्यासाठीचे नियोजन झाले आहे. चाचणीदरम्यान काही अडथळा आल्यास तो दूर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

 

उद्यापासून हायस्पीड चाचणी

 

४ फेब्रुवारीला विधनवाडी ते राजुरी व ५ फेब्रुवारीला राजुरी ते बीड मार्गावर धावणार रेल्वे

 

बीड जिल्हावासियांचे सेवेचे स्वप्न पुर्णत्वाकडे जात आहे. टप्प्या-टप्याने आहिल्यानगर ते परळीचे काम पूर्ण होत असून काम झालेल्या लोहमार्गावर चाचणी देखील पार पडत आहे. विधनवाडी ते राजुरी आणि राजुरी ते बीड या दरम्यान नवीन लोहमार्गाची जलदगती चाचणी ४, ५ पेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सांयकाळी ६ या वेळेत होणार आहे. त्यामुळे या मागातील ग्रामस्थांनी रेल्वे मार्गापासून दूर राहावे अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच याबाबत रेल्वे प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही कळविले आहे

 

बीड जिल्हावासीयांचे रेल्वेचे स्वप्न आता पुर्णत्वाकडे जात आहे. मागील काही

 

वर्षांपासून रेल्वे कामाची मंदावलेली मती दूर झाली असून कामास आता वेग

 

झाला असल्याचे दिसून येत आहे. निधनवाडी ते राजुरी या नगीन लोहमार्गाची

 

जलदगती चाचणी ३० ते ३१ डिसेंबर या दोन दिवसांमध्ये सकाळी १० ते

 

सायंकाळी ६ या वेळेत घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुढील टप्पा पार

 

पडत आहे. ४ फेब्रवारी रोजी विधनवाडी ते राजुरी आणि ५ फेब्रुवारी रोजी

 

राजुरी ते बीड या मार्गावरील रेल्वे लोहमार्गाची जलदगती बाचणी पार पडणार

 

आहे. त्यामुळे संबंधित चाचणी व्गत येणान्या गावकन्यांनी रेल्वे मार्गापासून

 

दूर रहावे, तसेच गुरे, पाळीव प्राणी इत्यादी चाचणी दरम्यान रुळावर येणार

 

नाहीत याची काळजी घ्यावी. लोहमार्गालगत चाचणी दरम्यान कोणीही वावरू

 

नये अशी सूचना देण्यात आल्या आहेत. या संबंधीचे पत्र उपजिल्हाधिकारी

 

समन्वय

यांनी पाटोदा, बीडच्या उपविभागीय अधिकान्यांना दिले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.