Latest Breaking News Form Maharashtra

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात..

बीडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरूवात..

काल दिनांक ६ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर दुपारी ३ नंतर पैसे पडल्याचे मॅसेज यायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये विविध रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आलेल्या दाखवत आहे. बीड तालुक्यातील नाळवंडी, घाटसावळी येथील शेतकऱ्यांनी पैसे खात्यावर पडत असल्याचे शेतकऱ्यांकडून कळले आहे.

 नेमके हे पडणारे पैसे सुरुवातीला शेतकऱ्यांना पीकविमा संबंधी असल्याचे वाटले. Dbt द्वारे एकाचवेळी शेतकऱ्यांना रकमा मिळत असल्याने शेतकरी संभ्रमात होते. शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमा, २०२३ मधील रखडलेला पीकविमा जमा झाल्याचे वाटले होते. मात्र याबाबत शहानिशा केली असता या रकमा अतिवृष्टी अनुदानाच्या असल्याचे समजले आहे. या रकमा मंडळ निहाय वेगवेगळ्या असून हेक्टरी मदतीचे प्रमाण देखील वेगवेगळे असल्याचे शेतकऱ्यांकडून कळते आहे.

हे अतिवृष्टी अनुदान बऱ्याच मंडळातील सदस्यांना अद्याप पर्यंत मिळालेले नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून प्रशासनाकडून देखील अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी kyc केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा झाल्याचे बोलले जात असले तरी संपूर्ण बीड जिल्ह्यातील अनुदान रकमा कधीपर्यंत जमा होतील हे प्रशासनाकडून अधिकृत रीत्या जेव्हा घोषित होईल तेव्हाच कळेल..

Leave A Reply

Your email address will not be published.