Latest Breaking News Form Maharashtra

राज्याच्या राजकारणात क्वचित दिसणारं चित्र… शून्यात हरवलेले चेहरे…नेमकी चर्चा काय असणार??😥

शून्यात हरवलेले चेहरे…!

 

विधिमंडळ अधिवेशनामधून हा फोटो आला.. तीन राजकारणी एकत्र बसल्याच दिसत असलं तरी यांच्यातील चर्चा मात्र गंभीर आहे.. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत… संबंधित फोटो पाहून संबंध महाराष्ट्र हादरला आहे.. सर्वसामान्य जनतेसह नेतेमंडळींवरही त्याचा परिणाम पडलाय… विधान भवन परिसरात आज त्याचा प्रत्यय बघायला मिळाला..

या घटनेमुळे सुन्न झालेले तीन नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकत्रितपणे बसलेले बघायला मिळाले…या तीनही नेत्यांचा एकत्रित फोटो हा खूप बोलका आहे… आ सुरेश अण्णा धस हत्या प्रकरणात पहिल्या दिवसांपासून बोलत आहेत, त्यासाठी भांडत आहेत तर जितेंद्र आव्हाड साहेब हे देखील मोर्चा आंदोलने व मीडिया माध्यमातून या विषयावर भाष्य करत आहेत..

मध्यंतरी या दोन्ही नेत्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता मात्र दोघांनी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अतोनात प्रयत्न केले आहेत.. २ ज्येष्ठ नेते विरोधी पक्षातील अन् १ आमदार सत्ताधारी असा हा फोटो.. शून्य भावना असलेल्या या फोटोत आ सुरेश अण्णा धस हे जयंत पाटील यांना गांभीर्याने काहीतरी सांगत आहेत..

 

मी जेवढ धस अण्णांना ओळखतो त्यात अण्णा हे नक्कीच कालच्या फोटो बद्दल अन् केलेल्या अमानुष अत्याचाराबद्दल सांगत असणार आहेत.. आमदार सुरेश अण्णा हे पहिल्यापासून याबाबत बोलत आले आहेत.. आरोपींनी किती निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या केली त्याचा प्रत्यय ते फोटो पाहिल्यावर येतो. अंगावर काटा येईल इतके भीषण फोटो ते आहेत…

आरोपींनी संतोष देशमुखांची खूप हालहाल करुन हत्या केली… त्याहीपेक्षा खतरनाक म्हणजे आरोपींनी संतोष देशमुख पाण्यासाठी व्याकूळ झालेले असताना आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका केली…. तळपायाची आग मस्तकात जाईल, असा हा प्रकार आहे….

 

DhananJay GundeKar, Beed

096890 43949

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.