सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही…!!
अती तिथं माती होणारच.. पक्ष सांगतो नैतिकता अन् हे म्हणतात वैद्यकीय कारण.. मुंडेंची बाजू घेणाऱ्यांनी ह्या बाबी तपासून घ्याव्यात.. मनाचा कोडगेपणा आसलेल्या नेत्यांच्या आपण सावलीला पण जवळ नाहीत याचं समाधान कायम राहील..

हालहाल करून माणूस मारला.. स्वतःच्या शीर्ष नेत्यानं म्हणजेच साक्षात अजित दादांनी महिना झालं नैतिकता शिकवून तरी त्याचा उपयोग झाला नाही.. हटवादी स्वभाव अन् जनमानसातील डागाळलेली प्रतिमा असताना देखील गेल्या काही महिन्यांपासून खुर्चीला चीटकुन बसायची इच्छा हे सगळं जनतेने पाहिलं आहे..

अगदी काल पंकजाताईंनी देखील राजीनामा द्यायला उशीर झाला, त्याऊपर जाऊन शपथच घ्यायला / घ्यायला नव्हती पाहिजे इथपर्यंत म्हंटले आहे.. गंमत भाऊंनी आज बरोबर बातमी केली आहे.. नियती कधीच कुणाला माफ करत नाही..मोठमोठे आले अन् गेले ..

मी या नेत्यांचं अनेकदा कौतुक केलं आहे मात्र या आताच्या काळातील कुख्यात अंगाने हा नेता कधी वाटलाच नाही असा असेल.. सत्ता टिकवताना अन् चालवताना अनेक बाबी कराव्या लागतात मात्र खंडणी, धमकी, दहशत हे लोकशाहीत चालणार नाही ..
मुंडे पुढच्या वेळी पुन्हा परळीत निवडूनही येतील मात्र त्यांची नीतिमत्ता अन् नैतिकता राज्याने ओळखली आहे.. ही हत्या त्यांचा पिच्छा आयुष्यभर पुरवणार.. कारण ही हत्याच त्यांच्या काही लोकांना लाडवण्यामुळे झालेली आहे एव्हाना त्यांचाही यात सहभाग असू शकतो म्हणूनही त्या अंगाने चौकशी व्हायला हवी अशी मागणी आ सुरेश अण्णा धस हे करत आहेत..!! धस अण्णांनी माजूर्ड्या सिस्टिमचा नादच पुरवला आहे…
धनंजय गुंदेकर, बीड
09689043949