Latest Breaking News Form Maharashtra

उपमुख्यमंत्री अजित दादांनी बीड साठी 200 कोटींचे घोषित केलेले इन्क्यूबेशन सेंटर नेमकं असतं काय?

उपमुख्यमंत्री अजित दादांनी बीड येथे 200 कोटींच्या इनक्युबेशन सेंटरची घोषणा केली.. मात्र हे इनक्युबेशन सेंटर नेमके काय काम करते? याबाबत जास्त कुणी अद्यापपर्यंत चर्चाही केली नाही.. राजकीय चर्चांना आपल्याकडे कमालीचा उत्साह असतो मात्र आपल्याच हिताच्या चर्चाबाबत आपल्याला काडीचा पण उल्हास नसतो.. यापैकी हे एक उदाहरण आहे..

 दोनशे कोटींचं इनक्युबेशन सेंटर बीडमध्ये उभारणार असल्याची जेव्हा घोषणा झाली तेव्हा खरे तर समोर बसलेल्या 99 टक्के लोकांना हे नेमकं काय आहे हे माहीतही नसेल.. माहितीचा अभाव सहाजिकच आहे..आपल्याकडे मराठवाड्यात आणि त्यातही बीड जिल्ह्यात असेही जास्त तांत्रिक बाबींच्या ज्ञानाचा अभाव आहे..

तर हे सेंटर मुख्यत्वे काम करते उद्योजकता विकासावर.. सुशिक्षित बेरोजगार अन् विद्यार्थ्यांना एखादं स्टार्टअप सुरू करायचं असेल किंवा त्यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ हवं असेल तर यासाठी मदत होते या इनक्युबेशन सेंटरची..

या सेंटरच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बायो-टेक्‍नॉलॉजी, ग्रीन टेक्‍नॉलॉजी, इन्व्हायरोमेंट टेक्‍नॉलॉजी, मटेरिअल सायन्स, इंटेलिजन्स सेक्‍शन अशा विविध विषयांतील स्टार्टअप्स आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना संधी मिळते.. यातून नवउद्योजक तयार होतात, नवनवीन संकल्पना पुढं येतात.. सगळं कसं वाचायला चांगलं वाटलं ना? मात्र दादानी हे सेंटर घोषित करताना ते आपण बीड येथे करत आहोत याची जाण ठेवली असेल..

 असं लिहायचं कारणही तसेच आहे.. असेच मराठवाड्यात फक्त एकच सुरू आहे अन् ते छत्रपती संभाजीनगर येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे बजाज इन्क्यूबेशन सेंटर या नावाने आहे.. या सेंटर मधून म्हणावं असा प्रतिसाद मिळालेला नाही.. बीडपेक्षा छत्रपती संभाजीनगर येथे शैक्षणिक संस्था, संकुले जास्त आहेत तरीही या सेंटर कडून प्रभावी अशी अंमलबजावणी दिसून आलेली नाही..

 मात्र दुसरे उदाहरण खुप चांगले आहे आणि ते खुद्द बारामती येथीलच असून येथील Aic Adt बारामती फाऊंडेशन हे इन्क्यूबेशन सेंटर प्रचंड प्रभावीपणे काम करत असून याद्वारे नवउद्योजक घडत आहेत अन् त्यांच्या संकल्पनांना मूर्त स्वरूप द्यायचं काम ते सेंटर करत आहे.. माननीय अजित दादांनी ची संकल्पना मांडली आहे ती बीड येथे पूर्णत्वास यायलाच पाहिजे..

मागासलेल्या मराठवाड्यात बीड त्यातल्या त्यात खूप मागास आहे आणि अशा परिस्थितीत जर बीड येथे इंक्युबेशन सेंटर होत असेल तर त्याचं स्वागतच होणार.. टाटा कंपनीच्या माध्यमातून 165 कोटी रुपयांची मदत लागणार असल्याचे दादा म्हणले व सर्व प्रकल्प 200 कोटींपेक्षा अधिक रकमेचा असणार आहे..

मात्र हे सगळं करताना घोषणेनंतर त्याचं मूर्त स्वरूप येणे खूप आवश्यक आहे आणि मूर्त स्वरूप आल्यानंतर हे सेंटर बारामतीच्या धरतीवर चालावे अन्यथा अनेक असे सेंटर तयार होतात आणि त्यानंतरच्या काळात बंदही पडतात असं या बीड जिल्ह्याच्या संभाव्य सेंटर बद्दल घडू नये.. अशी माफक अपेक्षा आहे..

धनंजय गुंदेकर

संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती बीड

096890 43949

(हा लेख माझे नाव वगळून कॉपी करू शकता.. कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचली पाहिजेच)

Leave A Reply

Your email address will not be published.