बजरंग बाप्पा खासदार..कामगिरी दमदार.. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या या नव्या रेल्वे मार्गास सर्व्हेक्षण निधी मंजूर
दमदार खासदार..आनंदाची बातमी… बीडचे खासदार बजरंग बाप्पा नवा रेल्वे मार्ग घेऊन येत आहेत……!!🚆 केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) (240 किमी) आणि औरंगाबाद-चालिसगाव (93 किमी) या दोन नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ₹8.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आज रेल्वे बोर्डाचे चेअरमन श्री. सतिश कुमार साहेब यांचे सोबत या रेल्वे मार्गाची ॲानलाईन पाहणी केली तसेच हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असं खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी म्हंटले आहे..
बीड परळी रेल्वे प्रत्यक्षात उतरत आहे अशातच आता एका नवीन रेल्वे मार्गाची मंजुरी मिळत असून आज सर्वेक्षण साठी मंजूर झालेल निधी जिल्ह्यातील नागरिकांना सुखद धक्का आहे. हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास जिल्ह्यात रेल्वेचे मोठे जाळे निर्माण होणार असून यातून जिल्ह्यातील मागासलेपणा कमी होण्यास मदत होणार आहे.
खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून फक्त या दोनच रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू आहेत असे नाही तर अजून एक मार्ग जिल्ह्यात होऊ शकतो यासाठी देखील खासदार सोनवणे हे प्रयत्न करत आहेत. रेल्वे सोबतच बीड जिल्ह्यात विमानतळ निर्मिती हा देखील मुद्दा खासदार बजरंग सोनवणे यांनी हाती घेतला असून लवकरच त्यासाठी ते पाठपुरावा करणार असल्याचे बोलले जात आहे..

✅ धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) (240 किमी) – ₹6 कोटी
✅ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)-चाळीसगाव (93 किमी) – ₹2.32 कोटी

ही रेल्वे मार्गिका मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती देईल.
💐 *बीड जिल्ह्याच्या तसेच मराठवाड्याच्या प्रगतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे!*
~ खासदार बजरंग सोनवणे

#RailwayDevelopment #MarathwadaProgress #newrailwayprojects