जिल्ह्यात जीवघेणे अपघात सत्र सुरूच; २ कारचा समोरासमोर अपघात; बीड तालुक्यातील २ तरुण व्यावसायिक तर दिंद्रूडच्या युवकाचा मृत्यू
जिल्ह्यात जीवघेणे अपघात सत्र सुरूच; २ कारचा समोरासमोर अपघात; बीड तालुक्यातील २ तरुण व्यावसायिक तर दिंद्रूडच्या युवकाचा मृत्यू
अंबाजोगाई – केज – मांजरसुंभा मार्गावर चंदनसावरगावजवळ काल शुक्रवारी रात्री दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ३ जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. या ३ जणांमध्ये बीड तालुक्यातील दोन व्यावसायिकांचा व दिंद्रूड येथील एका जणाचा समावेश आहे.
अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालेला होता. अपघातानंतर तत्काळ तेथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. यामध्ये बीड तालुक्यातील २ तरुण व्यावसायिक तर दिंद्रूडच्या युवकांचा मृत्यू झालेला आहे. बीड तालुक्यातील समनापुर येथील गणपत नारायण गोरे (वय ४०) व खांडे पारगाव येथील परमेश्वर नवनाथ काळे (वय ३९) तसेच अमित दिलीपराव कोमटवार (वय ३५, दिंद्रुड) तर एक जण गंभीर जखमी आहे.

मयत परमेश्वर काळे
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले आहे. मयतांचे शव विच्छेदन सध्या केज उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे.

मयत गणपत नारायण गोरे
मयत गणपत गोरे व परमेश्वर काळे यांचा वाहन खरेदी विक्री व्यवसाय असल्याचे कळते आहे. दोन्ही युवा व्यावसायिकांच्या अपघाती जाण्याने बीड तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात
येत आहे..