Latest Breaking News Form Maharashtra

बीड : अपघात सत्र सुरूच चालती चारचाकी गाडी जळून खाक…

 

बीड तालुक्यातील अपघात सत्र आज १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्र होत असताना देखील सुरूच आहे.. पाली जवळील अपघातानंतर आता अपघात बीड – परळी रोडवर ढेकनमोहा जवळ झाला आहे. यावेळी एका चालत्या चारचाकी गाडीने पेट घेतला आहे. थोड्याच वेळापूर्वी कोळवाडी नजिक ६ पेक्षा अधिक वाहनांचा एकमेकांवर आदळून अपघात झाला होता.. अन् दुसरा अपघात आता बर्निंग कारचा झाला आहे..

बीड तालुक्यात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायं ६:१० वाजण्याच्या सुमारास ६ पेक्षा अधिक वाहने एकमेकाला धडकली. या विचित्र अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत.

ट्रक,आयशर टेम्पो, अशोक लेलँड, कार,ऑटो रिक्षा, दुचाकी वाहनाचा अपघातात समावेश असून गंभीर जखमींना उपचारासाठी हलवले आहे. ट्रकमधील हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले होते.

 

ढेकनमोहा जवळील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी संस्थान नजिक झालेल्या या घटनेत एमएच १४ ईएफ ९४१४ ही indigo कंपनीची गाडी होती. घटना घडताच तत्काळ मदतीला ढेकनमोहा येथील युवक धावले. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते बाबू करांडे, सरपंच बंडू गाडीवान, बाबू गाडीवान, भगवान भोगे, सोनू शिंदे, अभिषेक देवकते, आकाश जोशी यांसह इतर युवकांनी गाडीची आग विझवण्यासाठी मेहनत घेतली. अग्निशामक दल, पोलिस यंत्रणा घटना कळताच घटनास्थळी तत्परतेने दाखल झाली मात्र गाडीने घेतलेला पेट संपूर्ण गाडी जळेपर्यंत थांबला नाही.. या चारचाकी मधील प्रवाशी प्रसंगावधान राहून बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते आहे.

 

६ वाहनांचा देखील झाला अपघात…

 

आज सायंकाळी मांजरसुंबा कडून बीड कडे हरभरा घेऊन येणारा कंटेनर कोळवाडी घाटात अचानक समोरील वाहनाने ब्रेक लावल्याने ट्रक,आयशर टेम्पो, अशोक लेलँड, कार,ऑटो रिक्षा ही वाहने एकमेकाला धडकुण विचित्र अपघात झाला. या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मालवाहू ट्रक मधील हरभरा पोते रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले होते. या अपघाताची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळतात तात्काळ अपघात स्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली व रस्त्यावरील हरभरा हटवण्याचे काम सुरू केले.तर काही लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन हरभऱ्याचे पोते लांबवल्याची माहिती मिळत आहे.

 

जखमींना उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे. काही काळ ट्रॅफिक झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मदतीला धाऊन आलेल्या लोकांनी व पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याचे कळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.