Latest Breaking News Form Maharashtra

तूर शासकिय हमीभाव खरेदी केंद्रांत नोंदणी सुरू

 

तूर शासकिय हमीभाव खरेदी केंद्रांत नोंदणी सुरू

 

तुरीच्या खरेदीसाठी बीड जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यावर्षी तूर शासकीय खरेदी भाव हा ७५५० असा आहे. शासकीय हमीभाव विक्री साठी शेतकऱ्यांना आधी खरेदी केंद्रावर जाऊन तुरीची नोंदणी करणे अनिवार्य असणार आहे.

 

शासन हमीभावाने तुरीची खरेदी करणार असून बीड, जालन्यात ९८९३ टन खरेदीचे उद्दिष्ट

 

यावर्षी मराठवाड्यासह राज्यात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाल्याने बाजारात तुरीचे भाव कमी झाले आहे. गेल्या वर्षी १० हजारांच्या पुढे तरीला भाव होता. यंदा भाव कमी झाल्याने शेतक-यांचे नुकसान होवू लागले. शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये म्हणुन शासनाने ७हजार ५५० रूपयाने तुर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तुर खरेदीसाठी जिल्हा निहाय खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. बीड, जालना जिल्ह्यात ९ हजार ८९३ टन तुर खरेदीचे उद्दिष्ट आहे.

 

शेतीमालाचे उत्पादन जास्त निघाल्यानंतर शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. गेल्या वर्षी तुरीला चांगला भाव होता. उत्पादन कमी असल्यामुळे तुरीला गतवर्षी १० हजार रूपयांच्या पुढे भाव मिळाल्यामुळे यावर्षी बहुतांश शेतक-यांनी सोयाबीन कापूस ऐवजी तुरीची लागवड केली. पाऊस चांगला पडला.

 

त्यातच वातावरण स्वच्छ राहिल्याने तुरीचे उत्पादन वाढले. तुरीचे उत्पादन वाढल्याने भाव कमी झाले. तुरीचे तुरीचे भाव कमी झाल्यामुळे शेतक-यांचे नुकसान होवू लागले. तुर खरेदी करण्यासाठी शासनाने खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. शासन ७ हजार ५५० रूपयाने शेतक-यांची तुर खरेदी करणार. जिल्हा निहाय खरेदी केंद्र सुरू करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांची तुर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बीड आणि जालना जिल्ह्यात ९ हजार ८९३ टन तुर खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

 

तूर खाजगी बाजारातील बाजार भाव आणि शासकीय हमीभाव यात यावर्षी जास्त काही फरक सध्या नाही. मात्र भाव जर कमी झाले तर शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करावी लागणार असल्याने शेतकरी नोंदणीस प्राधान्य देऊ शकतात..

 

 

शनिवारी खालीलप्रमाणे बाजारभाव होता…👇

 

🏦 *कृषि उत्पन्न बाजार समिती, बीड* 🏦

*(बीड मुख्य-बाजार)*

🌐 www.apmcbeed.com 🌐

 

*☘ बाजारभाव – दि: 15/02/2025 ☘*

 

▪ *गहू (FAQ)* : 12 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 2,500 *कमाल:* ₹ 3,501 *सरासरी:* ₹ 2,966.80

————————-

▪ *ज्वारी / हायब्रिड (Non-FAQ)* : 18 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 1,910 *कमाल:* ₹ 2,900 *सरासरी:* ₹ 2,250.29

————————-

▪ *बाजरी (FAQ)* : 04 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 2,500 *कमाल:* ₹ 2,591 *सरासरी:* ₹ 2,545.50

————————-

▪ *तूर (FAQ)* : 64 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 7,200 *कमाल:* ₹ 7,500 *सरासरी:* ₹ 7,349.87

————————-

▪ *राजमा (FAQ)* : 02 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 8,000 *कमाल:* ₹ 8,000 *सरासरी:* ₹ 8,000

————————-

▪ *हरभरा (FAQ)* : 18 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 5,500 *कमाल:* ₹ 5,701 *सरासरी:* ₹ 5,634

————————-

▪ *सोयाबीन (Non-FAQ)* : 66 क्विंटल

*भाव (प्रति क्विंटल)*

*किमान:* ₹ 4,000 *कमाल:* ₹ 4,000 *सरासरी:* ₹ 4,000

————————-

 

Leave A Reply

Your email address will not be published.