Latest Breaking News Form Maharashtra

ट्रॅक्टरच्या अपघातात ऊसतोड पती-पत्नीचा जागीच मृत्यू; ३ चिमुकली लेकरं पडले उघड्यावर

ट्रॅक्टरच्या अपघातात ऊसतोड पती-पत्नीचा जागीच मृत्यू; ३ चिमुकली लेकरं पडले उघड्यावर

 

बीड, दि.३१ ()ः- घरातील सुखी संसाराला नजर लागली की देव कोपला म्हणाव. आठ महिन्यापुर्वी वडीलांचे अकाली निधन झाल्यानंतर घरातील मोठा अन कर्ता असल्याने अनिल राठोड याने ऊसतोडणीला जावून संसार चालवत होता. सहा महिने कबाड कष्ट करून ऊसतोडणीचा पटा पाडून घराकडे परतत असतांना पाथर्डी कर्ज जामखेड येथे ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि यामध्ये माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील अनिल उर्फ पप्प राठोड व पत्नी आरती अनिल राठोड यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. याघटनेतर घरातील कर्ते पती-पत्नी यांचे निधन झाल्याने त्यांचे चिमुकली लेकरं उघड्यावर पडली आहे.

 

 

माजलगाव तालुक्यातील वारोळा तांडा येथील अनिल पिराजी राठोड व आरती अनिल राठोड असे मयत पती पत्नी यांचे नाव असून मागील सहा महिन्यापुर्वी आपल्या लेकरांना आज्जीपशी टाकत संसाराचा गाडा चालविण्यासाठी सोलापूरच्या कारखान्याला ऊसतोडणीला गेले होते. सहा महिने ऊसतोडणी करून गावाकडे परतत असतांना ट्रक्टरचा अपघात झाला यामध्ये त्यांचे मृत्यू झाले. गेली सहा महिने आपल्या आई बाबाच तोंड दिसले नाही आणि उद्या येणार असल्याचे आस लागून बसलेल्या लेकरांच्या असेला नजर लागली आणि सुखी संसार चालू असलेल्या कुटूंबार नियतीने डोंगर कोसळविला. अपघातात आई वडील दोघेही गेल्याने घरातील चिमुकली लेकरं अनाथ झाली आहेत. या अनाथ लेकरांच्या मदतीसाठी जिल्ह्यातील राजकीय पुढार्‍यांना पाझर फुटणार का की जाती पातीच्या राजकारणात आडून बसणार अशी खंत व्यक्त केली जात आहे.

 

चौकट

शेतकर्‍याचा पोर धनंजय गुंदेकर राबविणार मदत अभियान

 

 

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील वारोळा तांड्यावरील ऊसतोड मजूर असलेल्या कुटूंब सहा महिने मजूरी करून घरी परतत असतांना पाथर्डी कर्जत जामखेड जवळ मजूरांची टोळी घेवून येणार्‍या ट्रक्टरचा अपघात झाला यात अनिल राठोड व त्याची पत्नी आरती अनिल राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या कुटूंबाच संसार उघड्यावरती येत दोन मुली अन एक मुलगा अशी लेकर अनाथ झाली. या चिमुकल्या मुलांच्या आधारासाठी मदत तर सोडाच अपघातातील पती पत्नीला जिल्ह्यातील निर्धाड पुढार्‍यांना श्रदांजलीही वाहण्यांची इच्छाही झाली नाही. यामुळे जिल्ह्यातील दानशुरांपुढे आवाहन करत चिमुकल्यांच्या आधारासाठी शेतकर्‍यांचा पोर धनंजय गुंदेकर मदत अभियान राबविणार असल्याचे सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.