Latest Breaking News Form Maharashtra

बीड पुन्हा चर्चेत..हजारो युवकांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा

बीड पुन्हा चर्चेत आले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो युवकांचा मुक मोर्चा धडकला आहे. सध्या राज्यात अन् देशात बीड जिल्ह्याची विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा होते आता त्यात अजून एका विषयाची भर पडली असून हजारो युवकांचा मुक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे.. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे ..

 

आंदोलक मोर्चास संबोधित केले..

 

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आक्रमक, हजारोंच्या संख्येने कलेक्टर कचेरीवर धडकले

६ महिन्यांचा कार्यकाळ वाढ, १५% आरक्षण, वाढीव मानधनच्या मुक मोर्च्यात केल्या मागण्या

 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत विविध मागण्यासाठी शुक्रवारी (दि.१४ फेब्रुवारी) शेकडो प्रशिक्षणार्थीनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा कौशल्य अधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन दिले. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना अंतर्गत अनेक तरुण प्रशिक्षण घेत आहेत. या प्रशिक्षणार्थीनी कार्यकाळ ६ महिन्यांनी वाढवण्यात यावा, विद्यावेतन मध्ये वाढ करावी, युवा प्रशिक्षणार्थी यांना शासकीय सेवेत १५% आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मूक मोर्चा काढला.

 


मोर्चाची सुरूवात छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून झाली. सुरुवातीला जिल्हा परिषद येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले. तेथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांनी आपली भूमिका मांडली. संतप्त मोर्चेकऱ्यांनी आयटीआय येथे जाऊन जिल्हा कौशल्य अधिकाऱ्यांकडे देखील निवेदन देण्यात आले.

 


यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत आम्ही सर्व शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून बीड जिल्ह्यामध्ये विविध आस्थापना मध्ये विशिष्ट पदावर रुजू झालेले आहोत. तसेच वरील संदर्भाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आदेशानुसार ४.५ क्रमांकाच्या मुद्यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबधित उद्योग, आस्थापना निर्णय घेतील असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांच्या संदर्भात शासनाने तसा निर्णय घेण्या संबधित आस्थापना यांना आदेशित करून संबधित युवक-युवती यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी अशी मागणी केली. या मागणीचे निवेदन जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजक बीड विभागाच्या आधिकाऱ्यांना देण्यात आले. ८ दिवसांत यावर निर्णय नाही घेतला गेल्यास पुढील आठवड्यात आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे देखील यावेळी जाहीर करण्यात आले आहे. मोर्च्यात हजारो प्रशिक्षणार्थी तरुण उपस्थित होते.

 

महत्वाचे मुद्दे..

∆ मोर्च्यात महिला प्रशिक्षणार्थी यांचा लक्षणीय सहभाग
∆ शांततेत रांगेने मोर्चा, जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत होती मोर्चेकऱ्यांची लाईन
∆ शिक्षणदुत यांच्यासह आरोग्य दुत, योजना दुत या सर्व लाडक्या भावांचा या मोर्चात सहभाग
∆ पुढील आठवड्यात मागण्या संदर्भात होणार आमरण उपोषण
∆ रखडलेले मानधन तत्काळ देण्याची केली मागणी

Leave A Reply

Your email address will not be published.