पीक विमा 2024 अग्रीम वाटपाचे घोडे अडले कुठं? शेतकऱ्यांची कंपनीकडून होतेय अडवणूक की शासनाकडून? याला त्याला विचारण्यापेक्षा लिंक वर क्लिक करून पहा कारणे…
पीक विमा 2024 अग्रीम वाटपाचे घोडे अडले कुठं? शेतकऱ्यांची कंपनीकडून होतेय अडवणूक की शासनाकडून? याला त्याला विचारण्यापेक्षा लिंक वर क्लिक करून पहा कारणे…
बीड : खरीप २०२४ मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पीक विमा अग्रीम देणे अपेक्षित होते, परंतु त्यावर तत्काळ निर्णय झाला नाही. पीक विमा अग्रीम देण्यास जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने मंजुरी दिली जानेवारी महिन्यात दिली होती, त्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या सुद्धा पाठविण्यात आल्या. मात्र, शासनाकडून निधी आला नसल्याने पीक विमा अग्रिम मिळण्यास उशीर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१७ लाख १४ हजार पीक विमा नोंदी
१ जुलै ते १ ऑगस्ट २०२४ या कालावधीत १७ लाख १४ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. जुलैअखेर, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सततचा पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात २ सप्टेंबर २०२४ रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे व त्यानंतरच्या सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली होती. यासह इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने ९ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा संरक्षित क्षेत्राच्या २५ टक्के पेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सॅम्पल सर्व्हेचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पीकनिहाय विमा क्षेत्राचा अहवाल समितीस विमा कंपनीच्यावतीने सादर करण्यात आला. सदरील अहवालावर समितीने चर्चा करून पूर्ण झालेल्या सर्व विमा क्षेत्राच्या सर्वेक्षण अहवालास सर्वानुमते मान्यता दिली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पीक विमा अग्रीम मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, राज्य शासनाकडून त्यांचा निधी आला नसल्याने अग्रीम मिळण्यास विलंब होत असल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये १६ लाखांवर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. मागच्या वर्षी वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती आल्याने पीक विमा कंपनीच्यावतीने फिल्डवर जाऊन सर्व्हे करण्यात आले होते.
जिल्ह्यात सर्व्हे करण्यात आलेल्या ६ लाख ५९ हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा अग्रीम देण्यात येणार आहे, तर वैयक्तिक प्रकारातील २ लाख ४४ हजार शेतकऱ्यांना नुकसानाच्या प्रमाणात विमा रक्कम दिली जाणार असल्याचे ठरले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा संनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरील याद्या विमा कंपनीकडून मुख्य कार्यालयास पाठविण्यात आल्या आहेत.
• त्यानुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर करून त्यांना प्राप्त होणार असल्याचे जवळपास निश्चित होते, परंतु शासनाचा निधी प्राप्त झाला नाही. राज्य व केंद्र शासनाचा प्रिमियम भरणा आवश्यक असल्याचे समजते.