Latest Breaking News Form Maharashtra

बीड : शेतकऱ्याने तीन गुंठ्यांत पिकविला तब्बल साडे चार कोटींचा अफू, पहा कोण आहे तो शेतकरी अन् काय झाली कारवाई

बीड : शेतकऱ्याने तीन गुंठ्यांत पिकविला तब्बल साडे चार कोटींचा अफू, पहा कोण आहे तो शेतकरी अन् काय झाली कारवा

 

गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींनी गाजत असलेल्या बीड जिल्ह्यात अजून एका गुन्ह्याचे राज्याच्या नजरा बीडकडे वळवल्या आहेत. धारुरच्या एका शेतकऱ्याने तब्बल साडे चार कोटींचा अफू पिकवला आहे..

धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथील शेत गट नं. ३३ मध्ये रामहरी कारभारी तिडके या शेतकऱ्याने तीन गुंठे क्षेत्रावर शेततळ्याच्या माध्यमातून पाणी संकलित करत चार कोटी रुपयांची अफूची पिकविल्याचे शेती पोलिस कारवाईत उघड झाले. अटक केलेल्या शेतकऱ्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Oplus_16908288

शेतात अफू लागवडीबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथक व धारूर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. शेतात अमली पदार्थाच्या झाडाची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे दिसून आले. यावेळी अमली पदार्थ अफूची पांढरी शुभ्र फुले व त्यास गोलाकार बोंड असलेली हिरवी व पिवळसर पाने असलेली झाडे मुळासह ४२ गोण्या जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या वजनानुसार ५४० किलो ७५९ ग्रॅम अफू जप्त केला. बाजारमूल्यानुसार ८० हजार रुपये प्रतिकिलोप्रमाणे जप्त अफूची किंमत ४ कोटी ३२ लाख ६० हजार ७२० रुपये आहे. रामहरी तिडके याच्याविरुद्ध धारूर ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५चे कलम ८ (बी), १५, १८ प्रमाणे गुन्हा दाखल करून करण्यात आला आहेत. आरोपीला २ मार्च रोजी धारूर न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, अंबाजोगाईच्या अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उस्मान शेख, सपोनि विजयसिंग जोनवाल, उपनिरीक्षक महेश विघ्ने, ग्रेड उपनिरीक्षक हनुमान खेडकर, पोह. तुषार गायकवाड, महेश जोगदंड, भागवत शेलार, पो. अं. बप्पासाहेब घोडके, एएसआय संजय जायभाये तसेच धारूर ठाण्याचे सपोनि देविदास वाघमोडे, एएसआय भुसारी व कर्मचाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.

अफू नेमके काय असते??

 

अफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो.हेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे.

 

अफूपासून मॉर्फीन, कोडीन, नार्कोटीन, पॅपॅव्हरीन, थेबाइन वगैरे अल्कलॉइडे व त्यांची संयुगे प्राप्त होतात. प्रामुख्याने, ही रसायने वेदनाशामक आहेत. मात्र हल्ली त्यांचा मादक पदार्थ म्हणून जास्त उपयोग होतो.

 

नशेसाठी अफूचे सेवन प्राचीन काळापासून प्रचलित आहे. तिच्यामधील अल्कलॉइडे सेवन करून, धुरावाटे किंवा तिचा अर्क शरीरात टोचून वापरली जातात. नशेसाठी अफू सेवन केलेल्या व्यक्तीला पुनःपुन्हा सेवनाची इच्छा होऊन ती व्यक्ती व्यसनात कायमची गुरफटली जाते. जगातील बहुसंख्य राष्ट्रांत अफूचे सेवन व निर्मिती बेकायदा ठरविलेली आहे. भारतामध्ये अफूच्या झाडाच्या लागवडीवर, उत्पादनावर, औषधी घटकांच्या निर्मितीवर कायद्याने नियंत्रण आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.