Latest Breaking News Form Maharashtra

बीड : भीषण अपघात ६ वाहने एकमेकांना धडकली 

बीड : भीषण अपघात ६ वाहने एकमेकांना धडकली

 

∆ ट्रक,आयशर टेम्पो, अशोक लेलँड, कार,ऑटो रिक्षा, दुचाकी वाहनाचा अपघातात समावेश..

∆ जखमींना उपचारासाठी हलवले

∆ ट्रकमधील हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले…

∆ अन्नधान्याची नासाडी झाली..

 

 

बीड तालुक्यात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सायं ६:१० वाजण्याच्या सुमारास ६ पेक्षा अधिक वाहने एकमेकाला धडकली. या विचित्र अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. ट्रक,आयशर टेम्पो, अशोक लेलँड, कार,ऑटो रिक्षा, दुचाकी वाहनाचा अपघातात समावेश असून गंभीर जखमींना उपचारासाठी हलवले आहे. ट्रकमधील हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले…

आज सायंकाळी मांजरसुंबा कडून बीड कडे हरभरा घेऊन येणारा कंटेनर कोळवाडी घाटात अचानक समोरील वाहनाने ब्रेक लावल्याने ट्रक,आयशर टेम्पो, अशोक लेलँड, कार,ऑटो रिक्षा ही वाहने एकमेकाला धडकुण विचित्र अपघात झाला. या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

मालवाहू ट्रक मधील हरभरा पोते रस्त्यावर पडल्याने  काही काळ वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले होते. या अपघाताची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळतात तात्काळ अपघात स्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली व रस्त्यावरील हरभरा हटवण्याचे काम सुरू केले.तर काही लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन हरभऱ्याचे पोते लांबवल्याची माहिती मिळत आहे.

Oplus_131072

जखमींना उपचारासाठी हलविण्यात आलेले आहे. काही काळ ट्रॅफिक झाली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मदतीला धाऊन आलेल्या लोकांनी व पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याचे कळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.