Latest Breaking News Form Maharashtra

सोयाबीन बाबत राज्याच्या पणनमंत्र्यांनी दिलेली माहिती शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी…

 

सोयाबीन हमीभाव खरेदी वेळ वाढवून मिळावी यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. यापूर्वी 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ मिळालेली होती. मात्र या मदतीत शेतकऱ्यांची माप खरेदी केंद्रावर होऊ शकले नाही. शेतकऱ्यांना अजून वाढीव मुदत आवश्यक आहे. एकट्या बीड जिल्ह्यात अद्याप 40% पेक्षा अधिक शेतकऱ्यांची सोयाबीन विक्री बाकी आहे. शासकीय हमीभाव खरेदी केंद्र हे बारदाना व तांत्रिक कारणांनी बंद होते. या काळात खरेदीस विलंब लागला. या अनुषंगाने किमान ७ दिवसांची खरेदी मुदत वाढ मिळणे अपेक्षित आहे.

पणन मंत्री जयकुमार रावल

 

मात्र अशातच आता पणन मंत्री यांचे एक वक्तव्य शेतकऱ्यांची चिंता वाढवणारे आहे…महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. दि. 06 फेब्रुवारी 2025 अखेर 5 लाख 11 हजार 657 शेतकऱ्यांकडून 11 लाख 21 हजार 385 मे. टन सोयाबीनची खरेदी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

खरेदी केलेले सोयाबीन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या 345 गोदामांत तसेच भाडेतत्वावरील 252 खाजगी गोदामांत साठवणूक करण्यात आले आहे. मात्र या हंगामात सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सदर गोदामांची साठवणूक क्षमतादेखील पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

या त्यांच्याकडून आलेल्या माहितीने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा आहे मात्र या माहितीने मुदतवाढ मिळते का नाही अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे..

 

Leave A Reply

Your email address will not be published.