हमीभावाने सोयाबीन खरेदी मुदत मिळणार का? पणन विभागाच्या महत्वाचा खुलासा
राज्यात हमीभावाने होणारी सोयाबीन खरेदी मुदत संपल्यानंतर बंद झाली आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४,८९२ रुपये असताना, खासगी बाजारात जेमतेम ३,९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यातच आता राज्य सरकारच्या पणन विभागाने या संबंधी महत्वाचं खुलासा जाहीर केला आहे.

केंद्र सरकारने राज्याला १४ लाख १३ हजार २७० टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्टे होते, ते पूर्ण करण्यासाठी १२ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. पण, मुदत संपल्यानंतरही खरेदी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे राज्याच्या पणन विभागाने केलेल्या मागणीनुसार पहिल्यांदा ३१ जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली.
त्यानंतर पुन्हा ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. मुदतीअखेर १० लाख टन खरेदी पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अद्यापही १४ लाख टनांचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही.
पणन विभागाच्या वतीने खालील खुलासा केला आहे..👇
महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसांचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.
काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणामध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दररोजचा बाजार भाव आपल्या व्हॉट्सअँप वर मिळवण्यासाठी धनंजय गुंदेकर 9689043949 या क्रमांकला सेव्ह करून व्हॉट्सअँप मॅसेज वर आपले नाव, गाव व जिल्हा पाठवावा… तसेच लिंक वरील व्हॉट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी व्हावे…