Latest Breaking News Form Maharashtra

बीड शहर अन् जिल्ह्यातून अजून एक रेल्वे मार्ग जाणार, इस्टीमेट तयार….! पहा कसा असेल हा रेल्वे मार्ग..

बीड शहर अन् जिल्ह्यातून अजून एक रेल्वे मार्ग जाणार, इस्टीमेट तयार….! पहा कसा असेल हा रेल्वे मार्ग..


बीड :- अहिल्या नगर-बीड-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गाचे काम अंतीम टप्प्यात असतांना बीडकरांना आता आणखी एका रेल्वे मार्गाची गिफ्ट मिळणार आहे. या नवीन रेल्वे मार्गा बाबत जिल्हा वाशियांमध्ये मोठे कुतूहल आहे.

 

बीड रेल्वे स्थानक कामकाज सुरू असतानाच फोटो

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर या २४० किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचा सर्व्हे मंजूर करण्यात आला असून या रेल्वे मार्गासाठी ४ हजार ८५७ कोटी, ४७ लाख रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. येत्या काळात या मार्गाचे भूसंपादनाचे काम सुरु होईल. हा नवा रेल्वे मार्ग भविष्यात बीडसाठी मोठ्या प्रमाणात विकासाची दारे उघडणारा ठरणार आहे.

बीड – परळी रेल्वे मार्ग पुल

 

 

धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर या नव्या प्रोजेक्टचा सव्र्व्हे २०१८-१९ मध्ये करण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला होता. जो रिपोर्ट २८-७-२०२२ रोजी मंजूर करण्यात आला. या रेल्वेसाठी ४ हजार ८५७ कोटी रुपयांचे इस्टिमेट तयार करण्यात आले आहे. २४० किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग असणार आहे.

 

 

रेल्वे मार्गासाठी जो खर्च येणार आहे त्या खर्चाचा अर्धा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. सोलापूर-धाराशिव-तुळजापूर हा रेल्वे मार्ग अगोदरच मंजूर करण्यात आला असून त्याचे काम वेगाने चालू आहे. धाराशिव-बीड-छत्रपती संभाजी नगर हा रेल्वेमार्ग झाल्यास त्याचा मोठा फायदा बीडला होईल.

रेल्वे मार्गासाठी आंदोलने झाली. हा रेल्वे मार्ग कधी सुरु होईल या बाबत उत्सुकता होती, परंतु मागच्या आठवड्यात बीडपर्यंत रेल्वेची हायस्पीड चाचणी संपन्न झालेली आहे. विघनवाडीपर्यंत लाईटचे कामही पूर्ण झालेले आहे. त्यामुळे विघनवाडी ते बीड हे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर बीडपर्यंत रेल्वे येऊ नियमीत सुरु होणार आहे.

 

 

बीड ते वडवणी या रेल्वे मार्गाचे सुद्धा काम वेगाने सुरु आहे. येत्या ३ ते ४ महिन्यामध्ये वडवणीपर्यंत रेल्वेचे काम पूर्ण होईल. बीडच्या रेल्वे संदर्भातील सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत यासाठी लोकप्रतिनिधी आणि रेल्वे बोर्डाचे अधिकारी प्रयत्न करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.